Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

९०० वर्षांची परंपरा ‘कर्तव्य पथा’वर नेण्यासाठी आमदार सुभाष देशमुखांचा पुढाकार!

राजेश भोई by राजेश भोई
February 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
९०० वर्षांची परंपरा ‘कर्तव्य पथा’वर नेण्यासाठी आमदार सुभाष देशमुखांचा पुढाकार!
0
SHARES
25
VIEWS

आमदार सुभाष देशमुख यांची सांस्कृतिक मंत्र्यांकडे मागणी

सोलापूर: सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर महाराजांच्या ९०० वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक ‘गड्डा यात्रे’चा समावेश २०२७ च्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील ‘कर्तव्य पथा’वरील चित्ररथांमध्ये करावा, अशी लेखी मागणी सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

या संदर्भात आमदार देशमुख यांनी राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना पत्र पाठवले आहे.१२ व्या शतकातील युगपुरुष श्री सिध्देश्वर महाराजांनी सोलापुरात ६८ शिवलिंगांची स्थापना केली. त्यांच्या या कार्याचा आणि श्रद्धेचा वारसा गेली नऊ शतके अविरत सुरू आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात भरणारी ही ‘गड्डा यात्रा’ केवळ धार्मिक उत्सव नसून ती ग्रामीण संस्कृती आणि एकतेचे प्रतीक आहे. यामध्ये नंदीध्वज मिरवणूक, होम विधी आणि अक्षता सोहळा हे मुख्य आकर्षण असतात. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात. या भव्य परंपरेचे दर्शन संपूर्ण देशाला व्हावे, या उद्देशाने दिल्लीतील संचलनात महाराष्ट्राच्या वतीने ‘सिध्देश्वर यात्रा’ या विषयावर आधारित चित्ररथ साकारण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

आमदार सुभाष देशमुख यांच्या या पाठपुराव्यामुळे सोलापूरच्या वैभवाचा डंका आता थेट देशाच्या राजधानीत गुंजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूरकरांकडून या मागणीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.

Tags: Mla shubhash DeshmukhSolapurSolapur Mirrorगड्डा यात्रा
Previous Post

जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५ कोटींचा निधी मंजूर​

Next Post

आता उपचारांसाठी वणवण थांबणार! सोनी नगरचे आरोग्यवर्धिनी केंद्र ठरणार हजारो रुग्णांसाठी आधार.

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
आता उपचारांसाठी वणवण थांबणार! सोनी नगरचे आरोग्यवर्धिनी केंद्र ठरणार हजारो रुग्णांसाठी आधार.

आता उपचारांसाठी वणवण थांबणार! सोनी नगरचे आरोग्यवर्धिनी केंद्र ठरणार हजारो रुग्णांसाठी आधार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025