Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन

राजेश भोई by राजेश भोई
January 27, 2026
in Uncategorized
0
सोलापुरात ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन
0
SHARES
12
VIEWS

मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या शुभहस्ते उदघाट्न

सोलापूर : क्रेडाई सोलापूर तर्फे प्लॉट,फ्लॅटस्, रो हाऊझेस् , बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स , वित्तीय संस्था इत्यादीचे प्रॉपर्टी expo प्रदर्शन यंदा दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान नॉर्थ कोट हायस्कुल ग्राऊंड येथे आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती क्रेडाई सोलापूरचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी पत्रकार परीषदेत दिली. याचे उद्घाटन शुक्रवार ३० जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी यांच्या शुभहस्ते व सोलापूर जनता बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. ह्याप्रसंगी क्रेडाई नॅशनलचे सदस्य सुनिल फुरडे, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोमवार दि. २ फेब्रुवारी पर्यंत दररोज स. १० ते रात्रौ ८ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले असणार आहे. क्रेडाई सोलापूर आयोजीत या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सह बँक हे मुख्य प्रायोजक असून माऊली लँडमार्क व जेजेआरव्ही समर्थ प्रसाद हे सह प्रायोजक आहेत .

यंदाच्या प्रदर्शनात सुमारे 65 स्टॉल्स् असून सोलापूरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्,फ्लॅटस्, बंगलोज्, रो-हाऊसेस, कमर्शिअल कॉम्प्लेक्स् तसेच अनेक बिल्डिंग मटेरियल  सप्लायर्स , वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहिती ही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक आनंद पाटील यांनी दिली. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. या प्रदर्शनात  रविवार दि. १ फेब्रुवारी  रोजी क्रेडाई वुमन्स विंग व युथ विंग च्या वतीने  रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. 

क्रेडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणे व स्वत: वर व्यवसाईक बंधने पाळून कार्य करणारी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रेडाई सभासदांकडून याचे काटेकोरपणे पालन केले जाते. ग्राहकांच्या अडी अडचणीही सोडविल्या  जातात. क्रेडाई सोलापूर द्वारे रक्तदान शिबीर , कामगारांसाठी विविध शिबिरांसह  वृक्षारोपण, सदस्यांसाठी माहितीपूर्ण चर्चासत्राचे आयोजन केले जातात अशी माहिती दिली.

वुमन्स विंग व युथ विंग -  क्रेडाई सोलापूर शाखेद्वारे क्रेडाई सोलापूर वुमन्स विंग व युथ विंगची स्थापना करण्यात आली असून बांधकाम व्यवसायात महिलांचा व युवकांचा सहभाग, प्रशिक्षण  , शैक्षणिक दौरा , सक्षमीकरण आदी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत पत्रकार परीषदेस प्रदर्शनाचे सह  समनव्यक दक्ष पटेल, क्रेडाई सोलापूरचे  उपाध्यक्ष  संतोष सुरवसे , सचिव  राजीव दीपाली , सह सचिव उमेश लोलगे  , माजी अध्यक्ष सर्वश्री किशोर चंडक. अविनाश बच्चूवार, प्रदीप पिंपरकर , समीर गांधी, अभय सुराणा , गुरुराज yellati यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सिध्देश्वर जोकारे , जनता बँकेचे सीईओ विनय दुनाखे, डेप्युटी जनरल मॅनेजर मकरंद जोशी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड..!

Next Post

राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!

Related Posts

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
Uncategorized

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

March 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.
Uncategorized

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: सोलापुरात १४ मागण्यांचे निवेदन सादर.

March 23, 2026
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.
Uncategorized

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

March 23, 2026
सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशनतर्फे बार कौन्सिल निवडणुकीच्या उमेदवारांशी थेट संवाद संपन्न

March 21, 2026
​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.
Uncategorized

​बार्शी आणि उत्तर सोलापूरचा डंका! दीपक वैद्य – इंद्रजीत पवार जोडीकडे सोलापूर जिल्हा परिषदेची धुरा.

March 18, 2026
मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी
Uncategorized

मनपा शिक्षकांचे वेतन रमजान सणापूर्वी करण्याची शिक्षक संघटनेची मागणी

March 12, 2026
Next Post
राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!

राजकारणातला चाणक्य हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025