सोलापूर शहरात ५ ठिकाणी घरफोडी करणारा सराईत आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ३,७२,८००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर: सोलापूर शहरात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे.
अधिक माहिती अशी आहे की 31 डिसेंबर 2025 रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात दिवसा घरफोडी झाल्याबाबत गु.र.नं. १०६०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार एका संशयित आरोपीला सापळा रचून ताब्यात घेण्यात आली .किसन महादेव व्हनकोरे (वय २९ वर्षे) व्यवसाय: मजुरी, सध्या राहणार – दादावस्ती, लोहगाव, पुणे (मूळ गाव – वाघदरी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे या व्यक्तीचे नाव आहे

सखोल चौकशीत आरोपीने सोलापूर शहरातील खालील ५ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे:पोलीस पथकाने आरोपीकडून एकूण ३,७२,८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये ५१ ग्रॅम (५.१ तोळे) सोन्याचे दागिने, ८२० ग्रॅम (८२ तोळे) चांदीचे दागिने जप्त करण्यात आली.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सपोनि दत्तात्रय काळे, पोउपनि मुकेश गायकवाड आणि त्यांच्या पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, अनिल जाधव, महेश शिंदे व इतर त्यांचे सहकार्य केले आहे










