सोलपूर ; सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित शालेय शहर स्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांच्या हस्ते झाले व सोलापूर जिल्हा प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे यांची ही आपल्याला उपस्थिती लाभली.यावेळी प्राध्यापक संतोष गवळी,विठ्ठल कुंभार सर, प्रसन्न काटकर सर, विभुते सर, मारुती घोडके , अक्षय गवळी, ॲड. संजय चव्हाण, आशिष हुंडेकरी यांनी उपस्थित लावली.शालेय शहर स्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस कार्ट येथे संपन्न झाल्या .
14 ,17 ,19 वर्षाखालील मुला मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये 61 मुलांनी तर 30 मुलीने सहभाग नोंदवला होता. यांना पंच म्हणून सुधीर सालगुडे .पूजा सालगुडे, महेश झांबरे, बालाजी केदार, चंद्रकांत वाघमोडे, प्रशांत केदार,गणेश बंडगर यांनी काम पाहिले.या स्पर्धा पार पाडण्याचे कार्य महानगरपालिका क्रीडा अधिकारी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी वसपटे यांनी केले. यशस्वी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील ,सचिव प्राध्यापक संतोष गवळी, राज्य लॉन टेनिस मानदसचिव राजीव देसाई यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

निकाल
14 वर्षाखालील मुलांच्या गटात
उपांत्य तनुज संचेती ,ऋषिकेश चव्हाण, यशवंतराजे पवार, विश्वजीत वसपटे
मुली मृण्मय गायकवाड,आराध्या जाधव, अनत शेख, प्रणव्या मेघनाथन
17 वर्षांखालील मुलांच्या गटात
आरव कनकी , शंभुराजे पवार , आर्यन येमुल, अजिंक्य वसपाटे
मुलींच्या गटात विपा श्यना सोनवणे,भवानी हिरेमठ,पलक जोसेफ भंडारीकोल्हापुरे यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला .
19 वर्षाखालील मुलांच्या गटात
सार्थक धुमाळ,रामभाऊ शेजाळ , मयूर वस्पटे, शिवा हडपद यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.








