Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्ह्यात ९१.६६ टक्के पल्स पोलिओ लसीकरण

Solapur Mirror by Solapur Mirror
June 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्ह्यात ९१.६६ टक्के पल्स पोलिओ लसीकरण

सोलापूर, : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. २८) सोलापूर जिल्ह्यात ४ लाख २१५ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली. अपेक्षित ४ लाख ३६ हजार ५९८ बालकांपैकी ९१.६६ टक्के बालकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी दिली. ग्रामीण भागात अपेक्षित बालकांपैकी ९१.६६ टक्के लसीकरण पूर्ण झाले. तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यक्षेत्रातील शहरी भागात ४३ हजार ६६७ पैकी ३७ हजार ७७१ (८६.५० टक्के) आणि सोलापूर महानगरपालिका हद्दीत १ लाख ६ हजार ४३ पैकी ९३ हजार ३४४ (८८.०२ टक्के) बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

या मोहिमेसाठी ग्रामीण, शहरी व महापालिका क्षेत्रात मिळून ६ हजार ५१३ लसीकरण बूथ उभारण्यात आले होते. ७ हजार २२२ कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरीय पर्यवेक्षकांनी मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी केली. बसस्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, विटभट्ट्या, साखर कारखाने, यात्रा व लग्न समारंभांच्या ठिकाणी विशेष लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच भटक्या व ऊसतोड कामगारांच्या वसाहतींमध्ये मोबाईल पथकांमार्फत लसीकरण करण्यात आले.

वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटींद्वारे जनजागृती करण्यात आल्याने मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे डॉ. कोपूरवाड यांनी सांगितले. उर्वरित बालकांचे लसीकरण ग्रामीण भागात तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस गृहभेटीद्वारे पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी 99 कोटीचा निधी मंजूर –

Next Post

ओम गर्जना चौक–बॉम्बे पार्क रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

Related Posts

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Next Post
ओम गर्जना चौक–बॉम्बे पार्क रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

ओम गर्जना चौक–बॉम्बे पार्क रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In