सोलापूर : सोलापूर शहराचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या जुनी मिल चाळ येथील निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने कोंड्याल कुटुंबीयांच्या निवासस्थानी भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.
श्री रामकृष्ण कोंड्याल व संगीता कोंड्याल यांच्या शुभहस्ते श्री गणरायाची विधिवत पूजा-अर्चा, प्राणप्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. यावेळी कोंड्याल कुटुंबीयांनी मनोभावे गणरायाचे दर्शन घेत शहरवासीयांच्या सुख-समृद्धीसह सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.
याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल, धनश्री कोंड्याल, पृथ्वीराज कोंड्याल, वीरश्री कोंड्याल यांच्यासह कोंड्याल कुटुंबीय उपस्थित होते. गणरायाच्या आगमनाने परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, गणेशोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व प्रगती लाभावी, तसेच शहराच्या विकासाला नवी दिशा मिळावी, अशी मनोभावे प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली.