Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : ज्या साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली आहे आणि ज्यांनी शेतकऱ्यांची ऊसबिले थकवली आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत चालू गाळप परवाना दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका साखर सहसंचालक किरण गायकवाड यांनी घेतली आहे.

सोलापूर विभागात २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत एकूण ३१ कारखान्यांनी परवाने घेतले आहेत. उर्वरित काही कारखान्यांचे परवाने त्रुटींची पूर्तता न झाल्यामुळे प्रलंबित आहेत. मात्र, आरआरसी कारवाईच्या फेऱ्यात अडकलेल्या कारखान्यांना गाळप परवाना देण्यास सहसंचालकांनी स्पष्ट नकार दिला आहे.

कारवाईच्या फेऱ्यात असलेले प्रमुख कारखाने
सिद्धेश्वर (कुमठे) व संत कूर्मदास (माढा) मागील हंगामात या दोन्ही कारखान्यांवर आरआरसी कारवाई झाली होती. सिद्धेश्वर कारखान्याकडे ३३ कोटी तर संत कूर्मदासकडे १३ कोटी रुपयांची ऊसविले थकीत होती. काही शेतकऱ्यांची बिले दिली असली, तरी सर्वांची देणी अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे दोन्ही कारखान्यांना यंदा परवाना मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. गोकुळ (धोत्री) – ओंकार ग्रुप : गोकुळ कारखान्याने मागील हंगामात ऊसबिले न दिल्यामुळे परवाना न घेताच विनापरवाना गाळप केले होते. याप्रकरणी प्रशासनाने कारखान्याला तब्बल ३० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. सध्या हा कारखाना ‘ओंकार ग्रुप’च्या ताब्यात असून, तहसीलदार महसूल स्तरावर आरआरसी कारवाईची प्रक्रिया राबवत आहेत. ओंकार प्रशासनाने अद्याप परवान्याची मागणी केलेली नाही; परंतु जुनी देणी मिळेपर्यंत वा कारखान्यालाही परवाना देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

शेतकरी संघर्ष समितीकडून निर्णयाचे स्वागत
शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहसंचालक किरण गायकवाड यांनी घेतलेल्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या हंगामातील गोकुळ कारखान्याकडील शेतकऱ्यांची हक्काची बिले व कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी अजूनही लढा सुरू आहे. ‘आमच्या घामाचा दाम दिल्याशिवाय ओंकार कारखाना धोत्रीला परवाना देऊ नये,’ अशी आक्रमक मागणी शेतकरी संघर्ष समितीचे अमोल पाटील यांनी केली आहे.

Tags: 'ओंकार ग्रुप'४६ कोटींची ऊसबिलेअमोल पाटीलकिरण गायकवाडतहसीलदारपरवानाशेतकरी संघर्ष समितीसंत कूर्मदास (माढा)साखर सहसंचालकसिद्धेश्वर (कुमठे)सोलापूर
Previous Post

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

Related Posts

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026
१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In