No Result
View All Result
सोलापूर,; मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून सोलापुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हातात संविधान घेऊन संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करीत जनतेत भ्रम निर्माण करणे हे काँग्रेसची बुध्दी भ्रष्ट झाल्याचे लक्षण आहे, अशी टीका महापौर विनायक कोंड्याल यांनी केली.
मंगळवारी, शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी हे ‘फेक नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून जनतेत गैरसमज निर्माण करीत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी यावेळी केला. मतदार यादी पुनरीक्षण हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम असून तो निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबविला जातो. मात्र, या प्रक्रियेचा फायदा केवळ भाजपलाच होणार असल्याचा गैरसमज काँग्रेसकडून पसरविला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे तसेच अपात्र नावे वगळणे यासाठी पुनरीक्षणाची प्रक्रिया राबविली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले, प्रणिती शिंदे या योगायोगाने खासदार झाल्या आहेत. भविष्यात जनता ही चूक नक्कीच दुरुस्त करेल. सोलापुरात पर्यटनासाठी यायचे, आंदोलनाचे नाटक करून लक्ष वेधून घ्यायचे, हा प्रकार आता जास्त दिवस चालणार नाही, अशी बोचरी टीका काळे यांनी केली. पत्रकार परिषदेस भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सुधा अळीमोरे आदी उपस्थित होते.
No Result
View All Result