विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचे शिक्कामोर्तब!
सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे तरुण आणि तडफदार उमेदवार दीपक जमादार यांच्या प्रचार दौऱ्याला प्रभागातील कानाकोपऱ्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
“युवाशक्तीची नवी दिशा, विकासाची नवी ओळख” : हे ब्रीदवाक्य घेऊन रिंगणात उतरलेल्या जमादार यांनी आपल्या पदयात्रेद्वारे मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे.
घरोघरी उत्स्फूर्त स्वागत : आज झालेल्या प्रचार फेरी दरम्यान महिलांनी ठिकठिकाणी दीपक जमादार यांचे औक्षण करून स्वागत केले. तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी क्रेझ दिसून येत असून, ‘युवा नेतृत्व-विकासाचे नेतृत्व’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विशेषतः प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जमादार यांनी दिलेले आश्वासन आणि त्यांचा आजवरचा जनसंपर्क यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी विश्वासार्हता निर्माण झाली आहे.

विकासाचा स्पष्ट ‘रोडमॅप’ : प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दीपक जमादार म्हणाले की, “प्रभाग २६ चा सर्वांगीण विकास हेच माझे एकमेव ध्येय आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला आपले आशीर्वाद हवे आहेत.

“ज्येष्ठ आणि तरुणांचा पाठिंबा : या प्रचार मोहिमेत केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. प्रभागातील अनेक रहिवाशांनी मत व्यक्त केले की, यावेळेस एका सुशिक्षित आणि कार्यक्षम तरुणाला संधी देऊन प्रभागाचा कायापालट करण्याची आमची इच्छा आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर मतदान करून विकासाची ही गंगा अखंड वाहती ठेवण्याचा संकल्प अनेक मतदारांनी यावेळी केला.

विरोधकांच्या गोटात खळबळ : दीपक जमादार यांना मिळणारा हा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छ प्रतिमा आणि प्रत्यक्ष कामाची आवड यामुळे जमादार यांची बाजू सध्या प्रबळ दिसत आहे. या प्रचार रॅलीत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.









