Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

Solapur Mirror by Solapur Mirror
July 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून, पूरनियंत्रणासाठी विविध धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या वाढत्या विसर्गाचा थेट परिणाम उजनी धरणावर होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून, येत्या काही दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी भर पडण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.रविवार (दि. २६ जुलै) सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, खडकवासला प्रकल्पातील धरणांसह पवना, चासकमान, भामा-आसखेड, घोड, आंद्रा, कळमोडी आणि वीर धरणांमध्ये ८५ ते १०० टक्क्यांदरम्यान उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

त्यामुळे नदीपात्र सुरक्षित ठेवण्यासाठी धरणांतून सातत्याने पाणी सोडण्यात येत आहे.सध्या मुळशी धरणातून १०,००० क्युसेक्स, पवना धरणातून ७,४५० क्युसेक्स, चासकमान धरणातून १५,००० क्युसेक्स, घोड धरणातून १२,००० क्युसेक्स, वीर धरणातून १३,९११ क्युसेक्स, भामा-आसखेड धरणातून ४,३९६ क्युसेक्स, वडिवळे धरणातून ४,७०४ क्युसेक्स आणि खडकवासला धरणातून २,९९६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या सर्व धरणांतील पाणी भीमा नदीमार्गे उजनी धरणाकडे येत असल्याने धरणातील आवक आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे.उजनी धरणाची पाणीपातळी सध्या ४९६.२०० मीटरवर पोहोचली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा १०९.९५ टीएमसी, तर उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा ४६.३० टीएमसी इतका झाला असून, उपयुक्त साठ्याची टक्केवारी ८६.४२ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणाचे जलसाठा क्षेत्र ३१७.८२ चौ. कि.मी. इतके नोंदविण्यात आले आहे.दौंड नदी मापन केंद्रावरून ५०१.१०० मीटर पाणीपातळीची नोंद झाली असून, उजनी धरणात तब्बल ५५,३१९ क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक कायम राहिल्यास उजनीचा जलसाठा झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या धरणाच्या सांडवा, वीजनिर्मिती केंद्र आणि रिव्हर स्लुईसमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नसला, तरी सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २८० क्युसेक्स, दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी ९० क्युसेक्स, भीमा-सीना बोगद्यासाठी ९०० क्युसेक्स आणि मुख्य कालव्यातून २,००० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.भीमा खोऱ्यातील पावसाचा जोर कायम राहिल्यास वरच्या धरणांमधील विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीस्थितीवर जलसंपदा विभागाचे बारकाईने लक्ष असून, नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: आंद्राउजनी धरणकळमोडी आणि वीरखडकवासलाघोडचासकमानटेंभुर्णीपवनापाणीपुरवठापुणे जिल्हाभामा-आसखेडमहानगरपालिकासोलापूर
Previous Post

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025