सोलापूर ; २८ जानेवारी २०२६ महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, शासनाकडून अधिकृत दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या आदेशानुसार तीन दिवसांचा दुखवटा: दि. २८.०१.२०२६ ते ३०.०१.२०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत संपूर्ण राज्यात शासकीय दुखवटा पाळला जाईल, या काळात सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. दुखवटा कालावधीत कोणतेही अधिकृत शासकीय मनोरंजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. आदेशानुसार, आज दि. २८.०१.२०२६ रोजी सर्व राज्य शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर यांनी सर्व संबंधित विभागांना सूचना लागू करण्य चे आदेश दिले आहेत










