बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत एकवटला होता.

अजित पवार यांचा मुलगा पार्थ आणि जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले.नेत्यांची आणि जनसागराची उपस्थितीअजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अंत्यविधीसाठी दिल्ली आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.











