Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माणुसकीचे दर्शन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाचवला अपघातग्रस्त चालकाचा जीव

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
माणुसकीचे दर्शन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाचवला अपघातग्रस्त चालकाचा जीव
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : सांगोला येथून गुन्ह्याचे काम आटोपून पंढरपूरच्या दिशेने येत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान साधून भीषण अपघातातील जखमी चालकाचा जीव वाचविला.गंभीर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही घटना शुक्रवारी (ता. ६) पहाटे ५.४५ च्या सुमारास खर्डी (ता. पंढरपूर) गावाच्या हद्दीत घडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र लांभाते हे अंमलदार नरोटे व किनगी यांच्यासह सांगोला येथील शासकीय कामकाज आटोपून पंढरपूरकडे येत होते. खर्डी गावाजवळ त्यांना एका पिकअपचा भीषण अपघात झाल्याचे दिसून आले. अपघाताची तीव्रता इतकी होती की पिकअपच्या समोरील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता आणि चालक स्टेरिंगमध्ये अडकून विव्हळत होता.काही वाहने थांबवून मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पिकअपचा पत्रा निघत नव्हता. त्यानंतर एक ट्रक थांबवून दोरीच्या साहाय्याने पिकअपचा पत्रा बाजूला ओढण्यात आला.

सुमारे ३० ते ३५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर चालकाला केबिनमधून बाहेर काढण्यात यश आले. जखमीला तातडीने रुग्णवाहिकेतून पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेत मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नाशिकहून पंढरपूरकडे येताना अपघात : नाशिक येथील पिकअप चालक द्राक्ष घेऊन पंढरपूरच्या दिशेने येत होता. पहाटेच्या सुमारास रस्त्यात थांबलेल्या एका वाहनाला पिकअपची जोरदार धडक बसली. धडक दिल्यानंतर समोरील वाहन निघून गेले. त्यामुळे पिकअप चालक गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये अडकून पडला होता. दरम्यान, सांगोल्यातील संगेवाडी येथील मंडलाधिकारी विजया नाईक व त्यांचा खासगी चालक वैभव मोरे यांच्याविरुद्ध सात हजार रुपयांची लाच घेतल्याची कारवाई करून पोलिस निरीक्षक लांभाते सोलापूरकडे परत येत असताना त्यांनी अपघातग्रस्त चालकाला मदत करून त्याचे प्राण वाचविले.

Previous Post

जेसीबीने पुष्पवृष्टी आणि क्रेनचा हार; रंजिता चाकोते यांच्या निवडीचा सोलापुरात ‘शाही’ जल्लोष!

Next Post

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय तांत्रिक महोत्सव संपन्न

Related Posts

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्हा

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
सोलापूर जिल्हा

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

May 20, 2026
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
Next Post
भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय तांत्रिक महोत्सव संपन्न

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय तांत्रिक महोत्सव संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025