Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महिला व बालविकास विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला महिला दिनाचा सोहळा

राजेश भोई by राजेश भोई
March 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महिला व बालविकास विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला महिला दिनाचा सोहळा
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर; सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम आसरा चौक येथील जामगुंडी मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस आणि विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त अंगणवाडी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. बालविकास प्रकल्प अधिकारी आस्मा आत्तार तसेच माळशिरस प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी यांनी सादर केलेल्या बॉलिवूड व साऊथ इंडियन मॅशअप नृत्यसादरीकरणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

   यावेळी विस्तार अधिकारी ऋषिकेश जाधव यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत येऊन अभंगाचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या या सादरीकरणामुळे सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. तसेच अकलूज प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी ‘देश रंगीला’ या संकल्पनेवर आधारित विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण केले. या माध्यमातून “विविधतेत एकता” हा भारताचा संदेश सुंदर पद्धतीने मांडण्यात आला. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला तो जिल्हा कक्षातील कर्मचारी यांनी आयोजित केलेला ‘माझी मुलगी, माझा अभिमान’ या थीमवर आधारित फॅशन शो. या फॅशन शोद्वारे “बेटी बचाओ, बेटी पढाओ” हा सामाजिक संदेश प्रभावीपणे देण्यात आला. वडील–मुलगी आणि आई–मुलगी या जोड्यांनी केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

याशिवाय जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस यांनी आपल्या कला, नृत्य व सांस्कृतिक सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात आदर्श अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या कर्तृत्वाचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे, वरिष्ठ सहाय्यक रेणुका प्रथमशेट्टी व विस्तार अधिकारी अनंत शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे संपूर्ण वातावरण उत्साह, आनंद आणि प्रेरणेने भारावून गेले. महिलांच्या सक्षमीकरणाचा व समाजातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Previous Post

लोकसेवा प्रशालेतील विद्यार्थ्यांचे यश कौतुकास्पद; मुख्याध्यापक प्रकाश कुंभार

Next Post

महापालिकेत इको-फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
महापालिकेत इको-फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी

महापालिकेत इको-फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025