महिला दिनानिमित्त नगरसेविकांना औषधी रोपांचे वाटप
सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सोलापूर महानगरपालिकेत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली.महिला दिनाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने महापालिकेतील सर्व महिला नगरसेविकांना एकत्रित करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी प्रत्येक नगरसेविकेला देशी व औषधी रोपांचे वाटप करून पर्यावरण जपण्याचा संदेश देण्यात आला. “हरित सोलापूर” घडविण्याच्या दिशेने वाटचाल करत शहर अधिक हिरवेगार करण्याचा निर्धार यावेळी सर्व नगरसेविकांनी व्यक्त केला.
या प्रसंगी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक सौ. रोहिणी तडवळकर, स्थायी समिती अध्यक्षा रंजना चाकोते, नगरसेविका संगीता जाधव, अश्विनी चव्हाण, सुधा अळळीमोरे, कल्पना कदम तसेच सर्व महिला नगरसेविका व भाजप महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.










