Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गरजू रुग्णांसाठी मंगेश चिवटे सरसावले; सोलापुरात लवकरच मोफत ‘इको’ आणि शस्त्रक्रिया..

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गरजू रुग्णांसाठी मंगेश चिवटे सरसावले; सोलापुरात लवकरच मोफत ‘इको’ आणि शस्त्रक्रिया..
0
SHARES
54
VIEWS

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्ह्यातील गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोफत ‘२डी इको’ (2D Echo), हृदय तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या पूर्वतयारीचा आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथे भेट दिली.यावेळी त्यांनी सोलापूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. वर्षा डोईफोडे यांच्याशी वैद्यकीय कक्षात सविस्तर चर्चा केली.

आगामी शिबिरासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, मनुष्यबळ आणि रुग्णांची नोंदणी प्रक्रिया यावर यावेळी प्रामुख्याने भर देण्यात आला.मंगेश चिवटे यांनी केवळ नियोजनाची चर्चाच केली नाही, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या विविध वॉर्डांमधील रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेतली. रुग्णांना मिळणारे उपचार, औषधोपचार आणि सोयी-सुविधांबाबत त्यांनी विचारपूस केली. गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि धीर देत त्यांनी प्रशासनाला सूचनाही केल्या.मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो गोरगरीब रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले आहेत.

अत्यंत साध्या आणि संवेदनशील स्वभावाच्या चिवटे यांनी राज्यातील दुर्गम भागातील रुग्णांनाही वेळेत उपचार मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामान्यांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी त्यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या पत्रकार परिषदेस शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्राचार्य बापूसाहेब अडसूळ, मनिष काळजे, सुरज जम्मा आदी उपस्थित होते. 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल (ठाणे), आरोग्यदूत फाऊंडेशन आणि शिवसेना सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरासाठी प्रमुख तज्ज्ञ डॉक्टर डॉ. आशुतोष सिंग आणि डॉ. पुजा सिन्हा उपस्थित राहणार आहेत. हृदयरोग असलेल्या बालकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, हे  मोफत आरोग्य शिबिर सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे. या 2डी इको शिबिरामध्ये ज्या बालकांसाठी पुढे शस्त्रक्रिया करायच्या आहेत, त्यांची मोफत शस्त्रक्रिया जुपिटर हॉस्पिटल, ठाणे या ठिकाणी मोफत होतील. आरोग्य शिबिरासाठी  सिव्हिल सर्जन डॉ. वर्षा डोईफोडे या सहकार्य करत आहेत.“मंगेश चिवटे : कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष

Previous Post

वटवृक्ष देवस्थानच्या कार्यात त्रिवेणी संगम : खा. सुनील तटकरे

Next Post

सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या लांडगे; रजनीकांत उपलंची सरचिटणीस

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या लांडगे; रजनीकांत उपलंची सरचिटणीस

सोलापूर क्राईम रिपोर्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी तात्या लांडगे; रजनीकांत उपलंची सरचिटणीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025