Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
29
VIEWS

पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी 4150.46 कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता ; १ ऑगस्टपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे निर्देश.

पंढरपूर ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीथक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4150.46 कोटीच्या सर्वसमावेशक आराखड्यास मान्यता देण्यात आली. पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकास आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात. पुढील 50 वर्षाचा विचार करुन या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामे येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वन मंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह जिल्हाधिकारी ,जिल्हा नियोजन अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूर हे राज्यातील महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक तीर्थक्षेत्र आहे. येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची सातत्याने वाढणारी संख्या, रस्ते, वाहतूक आणि अन्य संबंधित बाबी लक्षात घेता पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसराच्या समग्र व नियोजित विकासाची कामे वेगाने हाती घेण्यात यावीत.

पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छ, गर्दीमुक्त, सुरक्षित आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा हा विचार करून विकास कामे दर्जेदार, शाश्वत व भविष्याभिमुख पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. यासाठी बाधित निवासी व व्यावसायिक मालमत्ताधारक तसेच भाडेकरूंना योग्य मोबदला तात्काळ देण्यात यावा. भूसंपादनासाठी आवश्यक निधीही त्वरित उपलब्ध करून द्यावा आणि निधीअभावी कोणतेही काम अपूर्ण राहू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिल्या.

सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बैठकीत सादर केलेल्या प्रस्तावानुसार गर्दी व्यवस्थापनासाठी कॉरिडॉर उभारणी, पुरातन मंदिर व मठांचे जतन-संवर्धन, बाधितांना व्यावसायिक संधी आणि वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास यासाठी 735.80 कोटी रुपयांचा आराखडा मांडण्यात आला. तसेच नगर प्रदक्षिणा मार्ग विकास, नदी घाट सुशोभीकरण, वाहनतळ व व्यापारी संकुल, शहर सुशोभीकरण, रस्ते व पूल आणि पालखी तळांच्या विकासासाठी 1387.91 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. याशिवाय भूसंपादन व पुनर्वसन खर्च, बाधित इमारतींचा मोबदला आदींसाठी 2026.75 कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला. असा एकूण 4150.46 कोटी रुपयांच्या या सर्वसमावेशक आराखड्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

Previous Post

आरटीओची धडक कारवाई; २०२ वाहनांवर २०.२७ लाखांचा दंड

Next Post

महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता

महापालिकेत १०९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती; चौबे, मठपती कार्यकारी अभियंता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025