
पंढरपूर ; पंढरपूर येथे 65 एकर जवळील रेल्वेच्या जागेवर श्री संत नामदेव महाराज स्मारक निर्माण करण्यासाठी 99.99 कोटीचा निधी मंजूर असून या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी प्रदान केल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. यावेळी या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले वास्तूविशारद योगेश राठी यांनी श्री संत नामदेव महाराज समारक अंतर्गत अंतर्भूत केलेल्या कामांची माहिती पीपीटी द्वारा बैठकीत सांगितली.












