सोलापूर : उच्च शिक्षणासोबतच उज्ज्वल करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AGPIT), सोलापूर हे विश्वासार्ह शिक्षणकेंद्र ठरत आहे. संस्थेच्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेसह 85 टक्क्यांहून अधिक प्लेसमेंट, 110 पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी आणि ऑटोनॉमस संस्थेचा दर्जा यामुळे विद्यार्थी व पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बी.टेक. प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू झाले असून, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखांमध्ये प्रवेशासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत.
संस्थेत आधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक, उद्योगाभिमुख शिक्षण, MSME Incubation Center, Research & Development Center तसेच कौशल्य विकासावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संशोधन, नवोपक्रम आणि रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.यंदाच्या प्लेसमेंटमध्ये एका विद्यार्थ्याची फ्रान्समधील EDRLab या कंपनीत दरमहा 5,800 युरो पगारावर निवड झाल्याने संस्थेच्या गुणवत्तेचा ठसा राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटला आहे.
Capgemini, Cognizant, Tech Mahindra, TCS, Wipro, Infosys यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची सातत्याने निवड होत असल्याने करिअर केंद्रित शिक्षणासाठी ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनत आहे. त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी न दवडण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवेशासाठी संपर्क : ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस), सोलापूर📍