Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रखडलेली योजना, निकृष्ट कामे अन् थकीत वेतन; सात दिवसांत सत्य बाहेर येणार

Solapur Mirror by Solapur Mirror
July 31, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रखडलेली योजना, निकृष्ट कामे अन् थकीत वेतन; सात दिवसांत सत्य बाहेर येणार

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावातील रखडलेली पाणीपुरवठा योजना, निकृष्ट दर्जाची विकासकामे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाच्या प्रश्नावर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाला भूमिका घ्यावी लागली आहे. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलनानंतर जिल्हा परिषदेने संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश देत सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली २८ जुलैपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर मोहोळचे गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांना सर्व आरोपांची सखोल चौकशी करून सात दिवसांत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

संघटनेने सोहाळे गावातील ८ ते १० वर्षांपासून अपूर्ण असलेल्या पेयजल योजनेची चौकशी, विकासकामांतील कथित अनियमितता, ग्रामस्थांनी लावलेल्या झाडांच्या नावावर बिले काढल्याचा आरोप तसेच सटवाई मंदिर ते गैबी पीर रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीचे सेवानिवृत्त कर्मचारी बबन भालेकर आणि कार्यरत कर्मचारी विजय भालेकर यांचे थकीत वेतन उच्च न्यायालयाचे आदेश असूनही अदा करण्यात आले नसल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. या सर्व बाबींची प्रशासनाने नोंद घेत चौकशी सुरू करण्याची तयारी दर्शविली.

प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर जनहित शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सात दिवसांत अहवाल सादर होऊन दोषींवर कारवाई झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Previous Post

चिंचोली एमआयडीसीत दारू माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त ; राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

Next Post

‘एकाच दिवसात ३७ प्रकरणांना न्याय’; माध्यमिक शिक्षण विभागाची धडाकेबाज कार्यवाही

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
‘एकाच दिवसात ३७ प्रकरणांना न्याय’; माध्यमिक शिक्षण विभागाची धडाकेबाज कार्यवाही

'एकाच दिवसात ३७ प्रकरणांना न्याय'; माध्यमिक शिक्षण विभागाची धडाकेबाज कार्यवाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In