सोलापूर . राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन पहाट’ उपक्रमांतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने तळेहिप्परगा व मार्डी येथील ३० खेळाडू विद्यार्थ्यांना ट्रॅक पँट व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे ‘ऑपरेशन पहाट’ अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळेहिप्परगा व मार्डी येथील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात ३० खेळाडू विद्यार्थ्यांना ट्रॅक पँट व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात सातत्य, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर यश मिळवावे, असे आवाहन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदन गावडे, सोमनाथ कदम व अनंत चमके यांनी केले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, प्रवीण जर्दे, सुनील मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता सुपे, सिम्मा डोगरीनोटे यांच्यासह मार्डी व तळेहिप्परगा येथील पोलीस पाटील मेघराज काळे तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.