Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गायन-वादन-नृत्याच्या त्रिवेणी संगमाने रसिक मंत्रमुग्ध

Solapur Mirror by Solapur Mirror
August 31, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
गायन-वादन-नृत्याच्या त्रिवेणी संगमाने रसिक मंत्रमुग्ध

संगीत प्रतिभा महोत्सवा’ची रंगतदार सांगता; सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदीला उत्स्फूर्त दाद

सोलापूर : सुंद्री वादनाचे सुरेल स्वर, शास्त्रीय गायनाची मैफल, व्हायोलिनचे माधुर्य आणि भरतनाट्यम-कथकच्या बहारदार सादरीकरणाने सोलापूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. लोकमान्य टिळक सभागृह (ॲम्फी थिएटर) येथे रविवारी झालेल्या ‘संगीत प्रतिभा महोत्सवा’ची गायन, वादन आणि नृत्याच्या त्रिवेणी संगमाने रंगतदार सांगता झाली.

दुर्मिळ सुंद्री वाद्य कला अकादमी, सांस्कृतिक मंत्रालय (भारत सरकार) आणि सह्याद्री दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पंडित भिमण्णा जाधव यांच्या आयोजनातून महोत्सव पार पडला. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त वीणा पवार, माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर, सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सोमशेखर पाटील, श्रीकांत येळेगावकर, सह्याद्री वाहिनीचे महेंद्र जगताप, गणेश नास्ते व ऋषिकेश नागावकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

महोत्सवाचा प्रारंभ जाधव घराण्याच्या पाचव्या पिढीतील बालकलाकार कलाश्री जाधव यांच्या सुंद्री वादनाने झाला. त्यांनी ‘राग दुर्गा’मध्ये मींड, ताना व तिहाई सादर करत ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन पेश केले. त्यांना अजय यंगल यांनी तबलासाथ दिली. त्यानंतर रमा कुलकर्णी यांनी ‘राग पुरिया कल्याण’ सादर करून आपल्या गायकीची छाप पाडली. त्यांना नितीन दिवाकर यांनी तबला, तर राजकुमार सावळगी यांनी हार्मोनियमची साथ दिली जाधव घराण्यातील बालकलाकार व्यंकटेशकुमार जाधव आणि लंडनची शिष्यवृत्तीप्राप्त वेधा पोळ यांच्या सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदीने महोत्सवात विशेष रंग भरला. ‘राग यमन’मधील स्वररचना, तान, गमक आणि सवाल-जवाबाच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगाने भक्तिरसाची अनुभूती दिली. पुण्याचे वेदांग जोशी यांनी तबल्याची साथ केली.

कोलकात्याच्या प्रसिद्ध ठुमरी गायिका पं. रोजी दत्ता यांनी दोन ठुमरी व दादरा सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यांना जोथम कराळ यांनी तबला, तर ओंकार पाठक यांनी संवादिनीची साथ दिली. नृत्यविभागात एकता कांबळे यांच्या भरतनाट्यममधील भावमुद्रा, पदलालित्य आणि आकर्षक वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधले. कथक नृत्याच्या सादरीकरणात रूपक, एकताल आणि पंचम सवारीमधील लयकारी, तंत्रकारी व अदाकारीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साकव फाउंडेशनचे डॉ. जगदीश पाटील यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी गायत्री जाधव, अजय यंगल, श्रीशैल माने, देवराज पांढरे, रिया चव्हाण, वीर चव्हाण, पौर्णिमा शिवपुंजे आणि जोथम कराळ यांनी परिश्रम घेतले.

Tags: आयुक्त वीणा पवारगायन-वादनदुर्मिळ सुंद्री वाद्य कला अकादमीपंडित भिमण्णा जाधव
Previous Post

कसबा गणपती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू..

Next Post

मोक्क्यातील फरार आरोपी अखेर ‘एलसीबी’च्या जाळ्यात

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
मोक्क्यातील फरार आरोपी अखेर ‘एलसीबी’च्या जाळ्यात

मोक्क्यातील फरार आरोपी अखेर ‘एलसीबी’च्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In