Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आमदार-खासदार नसतानाही तालुक्यावर पकड; दक्षिण सोलापूरच्या राजकारणातील ‘पॉवरफुल’ नाव: सुरेश हसापुरे!

Solapur Mirror by Solapur Mirror
May 29, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
आमदार-खासदार नसतानाही तालुक्यावर पकड; दक्षिण सोलापूरच्या राजकारणातील ‘पॉवरफुल’ नाव: सुरेश हसापुरे!
0
SHARES
50
VIEWS

सोलापूर : दक्षिण सोलापूरच्या राजकारणात सत्तासमीकरणे हलवणारा आणि जनतेच्या संपर्कातील लोकनेता म्हणून सुरेश हसापुरे यांचे नाव कायम चर्चेत असते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, गावागावातील नेटवर्क आणि निवडणुकीतील अचूक राजकीय गणिते यामुळे हसापुरे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजकीय आणि सहकार क्षेत्रात राजकारणात त्यांनी अनेकांना ताकद दिली. कोणाला सभापती केले, कोणाला संचालक, तर कोणाला निवडणुकीत विजय मिळवून दिला. विधानपरिषद, डीसीसी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी त्यांची राजकीय फिल्डिंग प्रभावी मानली गेली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ते कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. डीसीसी बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज मिळवून दिले. त्यामुळे भीमा, सीना व हरणा नद्यांवरून पाइपलाइन करून शेतकऱ्यांना बागायत क्षेत्र वाढविता आले. आज दक्षिण तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळबागा वाढविण्यात हसापुरे यांचे मोठे योगदान आहे. कोणत्याही मोठ्या पदावर नसतानाही त्यांनी एखाद्या आमदार व खासदार यांच्या इतकाच निधी प्रत्येक गावांना मिळवून दिला. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचा स्नेह असल्यामुळे कार्यकर्त्यांची कामे लवकर मार्गी लागतात. अनेक मोठ्या नेत्यांना निवडणुकीत राजकीय समीकरणे जुळविता अडचणी येतात, तेव्हा सुरेशरावांना फोन लावा हे वाक्य हमखास ऐकायला मिळते. राजकीय रणनीती आखण्यात आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो.

मात्र, राजकारणाचे वास्तव वेगळेच असते. ज्यांच्या नावाची बाजार समितीच्या सभापतिपदासाठी कायम चर्चा झाली, त्यांचेच नाव ऐनवेळी मागे घेतले गेले. अनेकवेळा ‘सुरेशराव यांचे नाव फिक्स’ अशा चर्चा रंगल्या, पण शेवटच्या क्षणी राजकीय गणिते बदलली आणि खुर्ची दुसऱ्याकडे गेली. त्यामुळे राजकीय वापर झाला, पण योग्य न्याय मिळाला नाही, अशी भावना आजही त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येते. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसला सावरण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. मात्र, योग्यवेळी पक्षाने त्यांना अपेक्षित संधी दिली नाही, अशी चर्चा कायम त्यांच्या समर्थकांमध्ये ऐकायला मिळते. अलीकडच्या काळात त्यांनी भाजपसोबत जवळीकता वाढवून स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना साथ देत त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद दाखवून दिली.

आता पुढील टप्प्यात बाजार समितीच्या सभापतिपदासाठी त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दानुसार हसापुरे यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मुख्यमंत्र्यांचा शब्द स्थानिक नेत्यांनी खरा करून दाखविला तर तालुक्यात भाजपची ताकद आणखी वाढेल आणि काँग्रेसने उपेक्षा केलेल्या नेत्यास भाजपने न्याय दिला, सन्मान दिला हा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये दृढ होईल. राजकारणात अनेकांना उभे करणारे लोकनेते सुरेश हसापुरे यांना वाढदिवसानिमित्त व पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !
सतीश पालापुरे

Previous Post

ब्रह्मपुरी येथील रील्सस्टार रोहिणीचा ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये गळफास

Next Post

साहित्यविश्वात दक्षिण सोलापूर शाखेचा ‘मानाचा तुरा’ ; बालगंधर्वमध्ये सोलापूरच्या कार्याचा झाला सन्मान

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
साहित्यविश्वात दक्षिण सोलापूर शाखेचा ‘मानाचा तुरा’ ; बालगंधर्वमध्ये सोलापूरच्या कार्याचा झाला सन्मान

साहित्यविश्वात दक्षिण सोलापूर शाखेचा ‘मानाचा तुरा’ ; बालगंधर्वमध्ये सोलापूरच्या कार्याचा झाला सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In