Wednesday, July 29, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शालार्थ घोटाळाप्रकरणी शिक्षणसम्राट संजय गरुडला सोलापुरातून ठोकल्या बेड्या..

Solapur Mirror by Solapur Mirror
July 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शालार्थ घोटाळाप्रकरणी शिक्षणसम्राट संजय गरुडला सोलापुरातून ठोकल्या बेड्या..
0
SHARES
35
VIEWS

सोलापूर : : सरकारी शिक्षकांची बनावट ओळख ( तयार करून त्यांच्या नावे वेतन लाटल्याच्या कथित ‘शालार्थ घोटाळाप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख व भाजप नेते संजय गरुड याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. नाशिक न्यायालयाने त्याला १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्याने एका दिवसात तब्बल १७७ बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून शिक्षणसम्राट संजय गरूड याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीत ६७ वर्षीय गरुडविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरुड याच्या भूमिकेबाबत माहिती देताना सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) संदीप मिटके यांनी सांगितले की, गरुड याच्या व्यवस्थापनाखालील एका शैक्षणिक संस्थेशी संबंधित असल्याचे भासवून १५० हून अधिक शिक्षकांची बनावट प्रोफाइल्स तयार करण्यात आली होती.

तपासाची चाहूल लागताच गेला होता जिल्ह्याबाहेर…
संजय गरुड याच्या संस्थेच्या जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यात सुमारे १५ ते २० प्राथमिक व माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये, एक वरिष्ठ महाविद्यालय तसेच काही वसतिगृहे कार्यरत आहेत. एसआयटीने यापूर्वी अटक केलेले तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तपासाचा केंद्रबिंदू शेंदुर्णी येथील संस्थेकडे वळल्याचे सांगितले जात आहे. तपासाची चाहूल लागताच संजय गरुड गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याबाहेर निघून गेला होता.

१२ संस्थाचालक रडारवर…
या घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील दहा तसेच धुळे जिल्ह्यातील दोन शिक्षण संस्थाचालक पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील १० मोठे शिक्षण संस्थाचालक व चार अधिकाऱ्यांचा पाय खोलात आहे. यातील पाच ते सहा संस्थाचालक मोबाइल बंद करून फरार आहेत. या सर्वच संस्थाचालकांचा अटकेतील आरोपी प्रशांत वाडीले (धुळे) हा एजंट होता. वाडीले यास अटक करण्यात आल्यानंतरच अनेक बड़े मासे गळाला लागत आहे. शिक्षणाधिकारी हिंगोणेकर याच्यानंतर आता गरुड याला 3 पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला या कामात कोणी कोणी मदत केली याबाबत माहिती घेणे बाकी असल्याने त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार त्याला पाच दिवसांची कोठडी देण्यात आली

तपासाची चाहूल लागताच गेला होता जिल्ह्याबाहेर…
संजय गरुड याच्या संस्थेच्या जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा तालुक्यात सुमारे १५ ते २० प्राथमिक व माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये, एक वरिष्ठ महाविद्यालय तसेच काही वसतिगृहे कार्यरत आहेत. एसआयटीने यापूर्वी अटक केलेले तत्कालीन जिल्हा शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर तपासाचा केंद्रबिंदू शेंदुर्णी येथील संस्थेकडे वळल्याचे सांगितले जात आहे. तपासाची चाहूल लागताच संजय गरुड गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याबाहेर निघून गेला होता.

Tags: नातेपुतेशालार्थशिक्षणसम्राटसंजय गरुड
Previous Post

“गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना जीवनाला दिशा नाही!”

Next Post

नेहरू वसतिगृहाच्या गाळ्यांचा ‘आर्थिक गोंधळ’; जिल्हा परिषदेचा महसूल अडकला!

Related Posts

‘कामाचा ताण’ की काही वेगळे? सिव्हिलच्या अधीक्षकांचा राजीनामा..?
सोलापूर जिल्हा

July 28, 2026
शिवरायांच्या पराक्रमाने दणाणले हुतात्मा स्मृती मंदिर!
सोलापूर जिल्हा

शिवरायांच्या पराक्रमाने दणाणले हुतात्मा स्मृती मंदिर!

July 28, 2026
अक्कलकोटला मिळणार अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीची ‘नवी ओळख’!
सोलापूर जिल्हा

अक्कलकोटला मिळणार अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीची ‘नवी ओळख’!

July 28, 2026
अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा होणार ‘कॉरिडॉर’ धर्तीवर कायापालट!
सोलापूर जिल्हा

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचा होणार ‘कॉरिडॉर’ धर्तीवर कायापालट!

July 28, 2026
Next Post
नेहरू वसतिगृहाच्या गाळ्यांचा ‘आर्थिक गोंधळ’; जिल्हा परिषदेचा महसूल अडकला!

नेहरू वसतिगृहाच्या गाळ्यांचा ‘आर्थिक गोंधळ’; जिल्हा परिषदेचा महसूल अडकला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘कामाचा ताण’ की काही वेगळे? सिव्हिलच्या अधीक्षकांचा राजीनामा..?

‘कामाचा ताण’ की काही वेगळे? सिव्हिलच्या अधीक्षकांचा राजीनामा..?

July 29, 2026
नेहरू वसतिगृहाच्या गाळ्यांचा ‘आर्थिक गोंधळ’; जिल्हा परिषदेचा महसूल अडकला!

नेहरू वसतिगृहाच्या गाळ्यांचा ‘आर्थिक गोंधळ’; जिल्हा परिषदेचा महसूल अडकला!

July 29, 2026
शालार्थ घोटाळाप्रकरणी शिक्षणसम्राट संजय गरुडला सोलापुरातून ठोकल्या बेड्या..

शालार्थ घोटाळाप्रकरणी शिक्षणसम्राट संजय गरुडला सोलापुरातून ठोकल्या बेड्या..

July 29, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025