Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जनता बँकेचा ‘बाप्पा’ थाटात विराजमान; जनता बँकेची दिमाखदार मिरवणूक

Solapur Mirror by Solapur Mirror
September 14, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जनता बँकेचा ‘बाप्पा’ थाटात विराजमान; जनता बँकेची दिमाखदार मिरवणूक
0
SHARES
72
VIEWS

सोलापूर : हत्तीच्या प्रतिकृतीवर विराजमान झालेले श्री गणपती बाप्पा, पांढऱ्या शुभ्र गणवेशातील कर्मचारी आणि बहारदार लेझीमचे डाव सादर करणाऱ्या सोलापूर जनता सहकारी बँकेच्या लेझीम पथकाने गणेशभक्तांचे लक्ष वेधले. श्री गणेश चतुर्थी निमित्त सोमवारी जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दिमाखदार मिरवणूक काढून बँकेच्या नवी पेठ येथील मुख्य शाखेत श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

चार हुतात्मा चौकातून जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. प्रारंभी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते श्री गणपती बाप्पांची पूजा करण्यात आली. यावेळी बँकेच्या संचालिका चंद्रिका चौहान, संचालक ऍड. मल्लिनाथ शहाबादे, प्रमोद भुतडा, सरव्यवस्थापक मकरंद जोशी, सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ खुने यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेच्या १०० कर्मचाऱ्यांच्या लेझीम पथकाने लेझीमचे बहारदार डाव सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. या लेझीम पथकात बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनीही तितक्याच उत्साहाने सहभाग घेतला.

मिरवणुकीच्या अग्रभागी ‘वंदे मातरम’ चा संदेश देणारी भारतमातेची प्रतिमा लावण्यात आली होती. तसेच एका वाहनावर बँकेकडून ग्राहकांना देणात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची आणि सुविधांची माहिती फलकाद्वारे प्रदर्शित करण्यात आली होती. यावेळी बँड पथकानेही बँडच्या तालावर विविध भक्तीगीते सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावले. चार हुतात्मा चौकापासून सुरुवात झालेली ही मिरवणूक सुभाष चौक – नवी पेठ मार्गे बँकेच्या मुख्य कार्यालयात आली. यानंतर या ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना झाली.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, संचालिका चंद्रिका चौहान, सरव्यवस्थापक मकरंद जोशी, सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, जनसंपर्क अधिकारी मदन मोरे, मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ खुने, सचिव सिद्धार्थ गनगोंडा, उपाध्यक्ष अनिल बरगले, सहसचिव पवन रणसुभे, खजिनदार विनायक कुरापाटी, वसुली अधिकारी लक्ष्मण सुतार आदी मुख्य कार्यालयातील तसेच शाखांमधील अधिकारी, कर्मचारी, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: जनता बँकबँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसेसोलापूर जनता सहकारी बँक
Previous Post

महापौर कोंड्याल यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

Next Post

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In