Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: true; sv:16.1.15.1.W30; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 43;

0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील तेजस्विनी महिला प्रभाग संघाच्या कॅडर महिलांनी प्रभाग समन्वयक उमेश जाधव यांच्याविरोधात गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे.

वर्षभरापासून मानधन थकविणे, महिलांशी अरेरावी करणे, अपमानास्पद वागणूक देणे आणि ग्रामसंघाच्या निधीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत जाधव यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी महिलांनी केली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. २६) दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे आणि गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा गाजावाजा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे याच अभियानात काम करणाऱ्या महिलांना स्वतःच्या हक्काच्या मानधनासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रभाग समन्वयक उमेश जाधव यांनी मागील वर्षभरापासून महिलांचे मानधन थकवून ठेवल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मानधनाची विचारणा केल्यास समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अरेरावी आणि अपमानास्पद भाषेत बोलले जात असल्याची तक्रार महिलांनी केली आहे.

प्रभाग संघातील महिला नियमितपणे आपली जबाबदारी पार पाडत असतानाही त्यांच्या मानधनात कपात केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बैठकीला काही मिनिटे उशीर झाल्यास महिलांना बैठकीतून बाहेर काढणे, त्यांचा अपमान करणे आणि ‘मीच प्रभाग संघाचा मालक आहे’, अशा शब्दांत धमकावणे, असे प्रकार घडत असल्याचे महिलांनी निवेदनात नमूद केले आहे. या कथित मनमानी कारभारामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

केवळ मानधन आणि अपमानास्पद वागणुकीपुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोपही महिलांनी केले आहेत. ग्रामसंघाच्या निधीमध्ये अनियमितता करणे, खोटी माहिती देऊन सीआरपी आणि ग्रामसंघाकडून लाखो रुपयांचा निधी काढून घेणे, तसेच बनावट धनादेश तयार करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या आरोपांची सखोल चौकशी करून आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

प्रभाग समन्वयकांच्या कथित मनमानीमुळे स्वयंसाहाय्यता बचत गटांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या अभियानातच महिलांना अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर त्यांच्या न्यायासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. उमेश जाधव यांना तात्काळ निलंबित करून प्रभाग संघाची विशेष बैठक बोलवावी आणि सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी श्रीदेवी खिल्लारे, अनिता जिम्मासुरंडेगे, प्रियंका मुळे, आरिफा जमादार, स्वाती गायकवाड, सरस्वती म्हात्रेयोगी, शीला मातारंगेनी, फरजाना बागवान यांच्यासह उमेद अभियानातील इतर महिला उपस्थित होत्या.

Tags: उमेदगटविकास अधिकारीसभापती संदीप टेळेसमन्वयक उमेश जाधव
Previous Post

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

Related Posts

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!
सोलापूर जिल्हा

नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

October 26, 2026
दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!
सोलापूर जिल्हा

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

October 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In