सोलापूर : दक्षिण सोलापूरचे विधानसभा चे आमदार सुभाष देशमुख यांच्या होटगी रोड येथील निवासस्थानी विघ्नहर्त्या श्री गणरायाचे भक्तिभावाने मंगलमय आगमन झाले.
यावेळी देशमुख कुटुंबीयांनी सहकुटुंब श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा केली. गणरायाच्या आगमनाने देशमुख यांच्या निवासस्थानी आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांनी मनोभावे श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदावी, तसेच सर्वांची कार्ये निर्विघ्नपणे पूर्ण व्हावीत, अशी मनोभावे प्रार्थना श्रींच्या चरणी करण्यात आली.