सोलापूर : उत्तर सोलापूर विधानसभेचेआमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी विघ्नहर्त्या श्री गणरायाचे भक्तिभावाने मंगलमय आगमन झाले. गणेशोत्सवानिमित्त देशमुख कुटुंबीयांनी सहकुटुंब श्री गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा केली.
गणरायाच्या आगमनाने देशमुख यांच्या निवासस्थानी आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांनी मनोभावे श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदावी, तसेच प्रत्येकाचे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे, अशी मनोभावे प्रार्थना श्रींच्या चरणी करण्यात आली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने देशमुख कुटुंबीयांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, गणरायाच्या दर्शनासाठी नातेवाईक व आप्तेष्टांचीही उपस्थिती राहणार आहे.