सोलापूर : विजापूर रोड येथील ओम गर्जना सामाजिक युवाशक्ती सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कै. विजयकुमार तंबाके यांचे चिरंजीव विकास अण्णा तंबाके यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेतले. मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
दरम्यान, ट्रस्टीचे अध्यक्ष श्याम अण्णा धुरी यांच्या हस्ते विधिज्ञपदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. प्रियांका विकास तंबाके तसेच विकास तंबाके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.