सोलापूर – आमदार देवेंद्र कोठे आणि कोठे परिवाराच्या मुरारजी पेठ येथील राधाश्री या निवासस्थानी सोमवारी गणपती बाप्पांची विविध प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह त्यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे, आई सुहासिनी कोठे, बंधू नगरसेवक प्रथमेश कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात विधिवत पूजा-अर्चना करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
विघ्नहर्त्या बाप्पांच्या चरणी सुख, समृद्धी आणि जनसेवेची नवी ऊर्जा लाभो अशी मनोभावे प्रार्थना केल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.