Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

झेडपीत चार दिवसात साडेचार कोटींची कर वसुली ;उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांची माहिती..

Solapur Mirror by Solapur Mirror
October 30, 2025
in सोलापूर शहर
0
झेडपीत चार दिवसात साडेचार कोटींची कर वसुली ;उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ यांची माहिती..
0
SHARES
43
VIEWS

सोलापूर : मिशन स्वाभिमान संकलन मोहीमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून केवळ चार दिवसात जवळपास चार कोटी ५६ लाख २७ हजार ७७२ रूपयांची कर वसुली झाली आहे. या मोहिमेत सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली.

ग्रामपंचायतींच्या आर्थिक जिल्हा सबलीकरणासाठी परिषदेमार्फत मिशन स्वाभिमान कर संकलन वसुली कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींच्या स्वनिधीत वाढ करून स्थानिक विकासकामांना गती देणे हा असून, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आहे. या अभियानांतर्गत १४ ते १७ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातून जवळपास ४ कोटी ५६ लाख रूपयांची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे. या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करून सर्वाधिक वसुली करणा-वा ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृध्द गाव अभियानातील हा कर संकलन हा एक भाग आहे त्यासाठी तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील अधिक कर संकलन करणाऱ्या तीन ग्रामपंचायती आणि तीन हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या कर संकलन अधिक केलेल्या तीन ग्रामपंचाती अशा जवळपास सहा ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे.

त्यांचा सन्मान करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. ही मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ तसेच सर्व तालुका गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. कर संकलन मोहिमेत सर्वाधिक सांगोला तालुक्यातून ७६ लाख रुपयांची तर सर्वात कमी दक्षिण सोलापूर तालुक्यातून १२.४५ लाखांची वसुली झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातून १०.२२ लाख घरपट्टी तर ५.२४ लाख पाणीपट्टी वसूल केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातून ११ लाख ७३ हजार घरपट्टी, ७१ हजार पाणीपट्टी वसूल केली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात १५ लाख ९३ हजार घरपट्टी, ४ लाख ८३ हजार पाणीपट्टी वसूल केली आहे. माळशिरस तालुक्यात घरपट्टी ३२ लाख ८७ हजार, पाणीपट्टी १४ लाख ४० हजार वसूल केली आहे. बार्शी तालुक्यात ३१ लाख ५४ हजार घरपट्टी तर पाणीपट्टी २५ लाख २ हजार वसूल केली आहे. मंगळवेढा तालुक्यात ३४ लाख ४३ हजार घरपट्टी तर १६ लाख ४२ हजार पाणीपट्टी वसूल करण्यात आली.

स्वाभिमान कर संकलन मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मागील थकीत व चालू करांपैकी ४ कोटी ५६ लाख रुपयांची वसुली झाली आहे. ज्या ग्रामपंचायतीने सर्वाधिक वसुली केली आहे, त्यांना बक्षीस स्वरूपात विकासकामे देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाणार आहे. –
सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, सोलापूर

Previous Post

राजन पाटलांकडून भाजपचे लोकं शिव्या शिकतील ; उमेश पाटलांचा हल्लाबोल,

Next Post

यंदा मुहूर्त कमी अन् घाई जास्त दाते पंचाग यांनी दिली माहिती..!

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
यंदा मुहूर्त कमी अन् घाई जास्त दाते पंचाग यांनी दिली माहिती..!

यंदा मुहूर्त कमी अन् घाई जास्त दाते पंचाग यांनी दिली माहिती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025