Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Solapur Mirror by Solapur Mirror
October 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात शिक्षकांच्या नावनोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात बोगस शिक्षकांची नावे नोंदविण्यात आल्याचा संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी (दि. २२) सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून बोगस शिक्षकांची नावे नोंदविण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात साधारणतः १६०० शिक्षकांची बोगस नावनोंदणी झाल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकारामुळे शिक्षक मतदार नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवेदनानुसार, काही ठिकाणी शाळांच्या मुख्याध्यापकांचे बनावट सह्या व लेटरपॅड वापरून शिक्षकांची नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित मुख्याध्यापकांना या प्रकाराची माहिती नसतानाही त्यांच्या नावाचा आणि शाळेच्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या नावनोंदणीमागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

मोहोळ तालुक्यातील काही शाळांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशा प्रकारच्या नोंदणीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनात पंढरपूर तालुक्यातील एका शाळेचाही उल्लेख करण्यात आला असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बोगस नावे नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मुख्याध्यापकांच्या सह्यांची सत्यता, शाळांची कागदपत्रे आणि शिक्षकांच्या पात्रतेची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही शैक्षणिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारी महत्त्वाची लोकशाही प्रक्रिया आहे. अशा प्रक्रियेत बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार नोंदणी होत असल्याचे आरोप गंभीर असून, त्यांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित प्रकार सिद्ध झाल्यास दोषींवर भारतीय दंड संहितेच्या लागू तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवेदनाच्या प्रती पुणे विभागीय निवडणूक आयुक्त, सोलापूर शहर पोलीस आयुक्त तसेच सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. आता जिल्हा प्रशासन या आरोपांची कशा प्रकारे दखल घेते आणि शिक्षक मतदार नोंदणी प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.

मुख्याध्यापकांच्या बनावट सह्या आणि लेटरपॅडचा वापर?
नोंदणीसाठी सादर झालेली कागदपत्रे, संबंधित शिक्षकांची सेवा आणि मुख्याध्यापकांच्या सह्यांची सत्यता तपासल्यास वस्तुस्थिती समोर येऊ शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पडताळणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे.

Tags: अमोल शिंदेजिल्हाप्रमुखबोगस शिक्षकांच्या नोंदणी
Previous Post

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

Next Post

दुष्काळाचे भान, शिक्षणाला मान; वाल्मिकी जयंतीतून कोळी समाजाचा नवा आदर्श!

Related Posts

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
नक्षत्रे सरली, पावसाची आस उरली; बळीराजाचे डोळे स्वातीकडे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In