Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
स्पर्धा परीक्षांच्या स्वप्नांना ‘बालाजी अमाईन्स’चे बळ!
0
SHARES
0
VIEWS

पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेला नवे रूप; विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा अन् स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट

सोलापूर, : स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. बालाजी अमाईन्स लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत सोलापुरातील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिका विभागाचे नूतनीकरण करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावला आहे. विशेष म्हणजे, केवळ अभ्यासिकेचे रूपडे पालटण्यावरच न थांबता स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तकांचा संचही वाचनालयाला भेट देण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत, स्वच्छ आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने बालाजी अमाईन्सच्या वतीने अभ्यासिका विभागाचे नूतनीकरण करण्यात आले. यामध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र अभ्यास कक्ष, नवीन फर्निचर, स्वतंत्र टेबल-खुर्च्या, रंगकाम तसेच अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या विविध साहित्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना अधिक एकाग्रतेने अभ्यास करणे शक्य होणार आहे.

दरम्यान, नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी वाचनालयाला भेट दिली होती. त्यावेळी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार पुस्तकांची मागणी त्यांच्याकडे केली होती. विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक गरज लक्षात घेऊन बालाजी अमाईन्स व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच वाचनालयाला उपलब्ध करून देण्यात आला.

बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते हा पुस्तकसंच पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे विश्वस्त लक्ष्मीनारायण कुचन, विजय गुल्लापल्ली, गणपत कुरापाटी, दत्तात्रय गोटीपामूल, अरविंद चिन्नी तसेच बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आजच्या स्पर्धात्मक युगात विविध शासकीय सेवांमध्ये संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाबरोबरच योग्य संदर्भग्रंथ आणि आवश्यक शैक्षणिक सुविधांची गरज भासते. अशा परिस्थितीत बालाजी अमाईन्सने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. अभ्यासिकेच्या नूतनीकरणामुळे वाचनालयातील शैक्षणिक वातावरण अधिक सुविधायुक्त झाले असून, पुस्तकसंचामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदर्भसाहित्य उपलब्ध होणार आहे.

या सामाजिक उपक्रमाबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी आणि पदाधिकाऱ्यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळासह व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचे आभार मानले.

Tags: पांडुरंग दिड्डीबालाजी अमाईन्स लिमिटेडबालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकरसंचालक राम रेड्डीसार्वजनिक वाचनालयसीएसआरस्पर्धा परीक्षा
Previous Post

जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी राजकीय रणसंग्राम; गोरे विरुद्ध मोहिते-पाटील संघर्षाची चाहूल!

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

Related Posts

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!
सोलापूर जिल्हा

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

गणपती घाटावरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक सात्विक बडवे सरसावले!

October 27, 2026
सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन..!

October 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

सोलापूर जिल्ह्यातील पावणेदहा लाख बालकांना जंतमुक्तीचे कवच!

October 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In