Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बिहार निवडणुकांतील विजयानंतर एमआयएचा सोलापूरमध्ये जल्लोष

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 15, 2025
in सोलापूर जिल्हा
0
बिहार निवडणुकांतील विजयानंतर एमआयएचा सोलापूरमध्ये जल्लोष
0
SHARES
20
VIEWS

सोलापूर; बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयानंतर सोलापूर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. निकाल जाहीर होताच सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष हाजी फारूक भाई शाब्दि यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि विजयी आनंद जल्लोषात साजरा केला.

सोलापूर शहरातील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोस्तव साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना फुले उधळून शुभेच्छा दिल्या. एकमेकांना मिठाई खाऊ घालत आनंद साजरा केला. बिहारमधील ऐतिहासिक निकाल हा पक्षाच्या विचारधारेवर लोकांच्या पडलेल्या विश्वासाचे प्रतीक असून या विजयामुळे महाराष्ट्रातही नवीन उर्जा निर्माण झाली आहे.

“हा विजय लोकांच्या आशा-अपेक्षांचा आणि बदलाच्या इच्छेचा परिपाक आहे,” असे फारूक शाब्दि यांनी सांगितले. पक्षाच्या वतीने सोलापूरात विजय महोत्सवाचे विशेष आयोजन केले होते. यात अनेक तरुणांनी उपस्थित राहून देशभरातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमात पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत शांतता आणि सुव्यवस्था राखली. विजयानंतर फारूक शाब्दि यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “बिहारमधील हा ऐतिहासिक विजय हा जनतेच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला असून सोलापूरसह देशभरातील कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे हा उत्साह दुणावला आहे.” सोलापूरातील या विजय जल्लोषामुळे संपूर्ण शहरात निवडणूक विजयानिमित्त आनंदाची लहर उमटलेली पाहायला मिळाली.

बिहारमधील यशाबाबत ओवेसी काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसी यांनी सीमांचलच्या लोकांचे आभार मानले आहेत. एमआयएमच्या 5 उमेदवारांनी विजयी केल्याबद्दल आभार मानतो, असं ओवेसी म्हणाले. सीमांचलसाठी 11 वर्षांपासून लढा सुरु केला आहे, तो अजूनही सुरु आहे, असं ओवेसी म्हणाले. बिहारमध्ये एनडीए जिंकेल अशी आशा होती, मात्र 200 जागा मिळतील असा अंदाज नव्हता. बिहारच्या जनतेचा जनादेश आपण मनापासून स्वीकारला पाहिजे,
असं ओवेसींनी म्हटलं. यावेळी त्यांनी नितीशकुमार यांचं देखील अभिनंदन केलं. दरम्यान, 2020 च्या विधानसभा निवडणकीत एमआयएमचे पाच आमदार निवडून आले होते. त्यापैकी चार आमदारांनी 29 जून 2022 ला एमआयएमची साथ सोडत राजदमध्ये प्रवेश केला होता. त्यावरुन अनेकदा असदुद्दीन ओवेसी यांनी राजदवर टीका केली होती. मात्र, 2025 च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमनं पुन्हा 24 उमेदवार उभे करत 5 जागांवर विजय मिळवला आहे.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात राष्ट्रीय बाल दिन साजरा..

Next Post

महापालिकेच्या वतीने आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

Related Posts

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
Next Post
महापालिकेच्या वतीने आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

महापालिकेच्या वतीने आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025