Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रात्र गस्तीच्या दरम्यान ६ दुचाकी व मोबाईलसह ७ चोरीचे गुन्हे उघडकीस

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 24, 2025
in क्राईम, सोलापूर शहर
0
रात्र गस्तीच्या दरम्यान ६ दुचाकी व मोबाईलसह ७ चोरीचे गुन्हे उघडकीस
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : रात्र गस्तीच्या दरम्यान शहर गुन्हे शाखेला रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करतांना या पथकाने केलेल्या कारवाईत सहा दुचाकी व एका मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. संबंधित आरोपीकडून चार लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. गुरुवारी (दि. 20) करणकुमार हरी राठोड (वय 38, रा. गणेश नगर, नवीन आर.टी.ओ. ऑफीसजवळ) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुमठा नाका येथील क्रीडा संकुलच्या मागील लेप्रसि कॉलनीत थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे करणकुमार हरी राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडील एसएच 13, ईजी 6737 या क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेत विचारपूस केली. टु व्हिलर रिकवरी एजंट म्हणून एका फायनान्समध्ये कामाला होतो. मी ते काम सोडले असून ॲक्सेस बँकेत लोन असलेल्या व कर्ज न भरलेल्या सहा दुचाकी शहरातील विविध ठिकाणांवरुन उचलून घेऊन त्या मोटारसायकल ॲक्सेस बँकेच्या डम्प यार्डला न लावता माझ्याकडेच ठेवून घेतल्याचे त्याने सांगितले. त्यावरुन त्याच्याकडील सहा दुचाकी जप्त केल्या. नंतर या दुचाकीच्या चोरीचा अभिलेख पडताळणी केली असता, त्या दुचाकीच्या चोरीबाबत गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले.

तसेच गोदुताई परुळेकर विडी घरकुल येथील मूजाहीद हमीद मनियार (वय 19) खडी मिशनजवळ, नवीन गोदुताई घरकुल, कुंभारी (सध्या रा. ताज मेडीकलच्या पाठीमागे, अशोक चौक) याला गेल्या रविवार रोजी (दि. 16) रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरलेला दहा हजार रुपयांचे मोबाईल संच जप्त केल्याचे उघडकीस आले. शहर गुन्हे शाखेने सहा दुचाकीसह एक मोबाईल संचच्या चोरीसह एकूण सात गुन्हे उघडकीस आणले. चार लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कामगिरी गुन्हे शाखेचे शामकांत जाधव व त्यांच्या तपास पथकातील बापू साठे, राजेश मोरे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे

Previous Post

न्यायमूर्ती सूर्यकांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश! सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

Next Post

सोलापुरात स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
सोलापुरात स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा

सोलापुरात स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025