Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ ..!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
February 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ ..!
0
SHARES
139
VIEWS

स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव करून दिला अनोखा संदेश !

सोलापूर - सोलापूर शहरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार सुभाष देशमुख, महापौर विनायक कोड्याल,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते महाराजाच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता. शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डाळिंब आड येथील मैदानात भगव्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली.यानंतर महाप्रसादाचे वाटप करून शिवजयंती उत्सवाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. परिसर जय भवानी जय शिवाजी घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

दरम्यान, १९ फेब्रुवारी पर्यंत शिवजयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. , मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, महिलांसाठी विशेष उपक्रम तसेच कुस्ती तसेच युवकांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या सर्व कार्यक्रमांना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. शिवजयंती उत्सवामुळे शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिकेतील नगर अभियंता, विद्युत विभाग तसेच घनकचरा विभागातील स्वच्छता कर्मचारी महिलांचा मध्यवर्तीच्यावतीने शाल,श्रीफळ,स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तरा बरडे- बचुटे, संजीवनी मुळे, उज्वला साळुंखे, राजन जाधव, श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, नगरसेवक विनोद भोसले, शिवाजी वाघमोडे, ज्ञानेश्वर सपाटे, बाबासाहेब जाधव, दत्तामामा मुळे, सुशील बंदपट्टे, आशुतोष बरडे, विजय पुकाळे, प्रकाश ननवरे, भाऊसाहेब रोडगे, राजू काकडे, बापू जाधव, सुषमाताई घाडगे, मनीषा माने, चारुशीला जगदाळे, यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास घुले,सचिन स्वामी यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

Previous Post

महापालिकेची वीस तारखेला पहिली सर्वसाधारण बैठक ; यामध्ये 10 स्वीकृत सदस्यांची होणार निवड

Next Post

सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे प्रदर्शन :डॉक्टर ओंबासे

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे प्रदर्शन :डॉक्टर ओंबासे

सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे प्रदर्शन :डॉक्टर ओंबासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025