सोलापूर – नागरिकांचे तक्रारींचे निराकरण करण्याकरिता “जनता दरबार” व “तक्रार निवारण दिन” अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, यांच्या संकल्पनेतुन अलंकार हॉल पोलीस मुख्यालय येथे सकाळी १० ते संध्याकाळी १८ वाजेपर्यंत आयोजन केले होते. “जनता दरबार” व “तक्रार निवारण दिन” अनुषंगाने सुमारे १२४ तक्रारदार उपस्थित होते. प्रामुख्याने नागरिकांनी जमिनीच्या कारणांवरुन, कौटुंबिक कारणांवरुन, शिवीगाळ व दमदाटी केल्याचे कारणांवरुन तसेच घरगुती कारणांवरुन असलेल्या तक्रारी समक्ष मांडल्या. तक्रारदारांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करुन त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या.
यासोबतच सोलापूरातील सर्व उपविभागामध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन प्रत्येक ठिकाणी SDPO व पोलीस निरीक्षक वगैरे अधिकारी उपस्थित ठेवण्यात आले होते. दरम्यान “जनता दरबार” व “तक्रार निवारण दिन” अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २३२ तक्रारी अर्जावर कार्यवाही करुन त्याचा निपटारा करण्यात आला. ज्या तक्रारीमध्ये गुन्हा दाखल करायचा आहे. त्यावर योग्य ती चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करणेबाबत स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. “जनता दरबार” व “तक्रार निवारण दिन” अनुषंगाने कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीचे मोठ्या प्रमाणात समुपदेशन करुन निराकरण अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, यांच्या उपस्थित पार करण्यात आले.

“जनता दरबार” व “तक्रार निवारण दिन” आयोजन करुन त्याचे पुर्तता करण्याकरीता अर्ज शाखेकडील उस्मान शेख पोसई पोहेकॉ ज्योती कोरे, पोकॉ सचिन चव्हाण, पोकॉ तांबोळी, मपोकों कुर्ले यांनी उपस्थित सर्व तक्रारदारांचे तक्रारीवर तात्काळ कारवाई होणेकरिता संबंधित पोलीस ठाणे यांच्यासमक्ष हजर ठेवून प्रसंगी पाठपुरावा करुन तक्रारदारांचे निरसन कसे होईल याकरीता प्रयत्न केले आहेत. महिला शाखा भरोसा सेल पथकामधील मसपोफौ गंगुबाई कवचाळे, मपोहवा मोहिणी भोगे, मपोकॉ मधुमती शिंदे, मपोकॉ अर्चना मस्के असे सुरुवातीपासून हजर राहून अनेक कौटुंबिक तक्रारीचे समुदेशन करुन समाधान केले आहे










