Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भामरागड ते सोलापूर: डॉ. मंदाकिनी आमटे यांचा ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने सन्मान..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भामरागड ते सोलापूर: डॉ. मंदाकिनी आमटे यांचा ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने सन्मान..
0
SHARES
6
VIEWS

अहिल्यारत्न’ डॉ. मंदाकिनी आमटे यांचे भावूक प्रतिपादन

सोलापूर, : – भामरागडच्या दुर्गम जंगलात काम सुरू केले तेव्हा रस्ते, वीज, पाणी अशी कोणतीही सुविधा नव्हती. आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती आणि आरोग्यसेवेची कोणतीही साधनेही नव्हती. मात्र सातत्याने सेवा दिल्यामुळे त्यांचा विश्वास जिंकता आला आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडू लागले, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केले.शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सातव्या नामविस्तार दिनानिमित्त तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका डॉ. मंदाकिनी आमटे यांना ‘अहिल्यारत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पदमश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, रोप आणि ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले.

मान्यवरांचा परिचय डॉ. अनिल घनवट यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या की, १९७२ साली विवाहानंतर पती डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आदिवासी बांधवांसाठी कार्य सुरू केले. त्या काळी तेथील परिस्थिती अत्यंत कठीण होती. रस्ते, पूल, वीज, पाणी तसेच संवादाची साधने नव्हती. सुरुवातीला आदिवासी बांधवांना आमची भाषा समजत नव्हती. मात्र त्यांची भाषा शिकून आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली. अंधश्रद्धेमुळे अनेक जण मांत्रिकांकडे जात असत; परंतु सातत्याने उपचार करून विविध आजार बरे झाल्यानंतर लोकांचा विश्वास बसू लागला. आरोग्यसेवेबरोबरच शेती आणि शिक्षण क्षेत्रातही काम सुरू करण्यात आले. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याची जाणीव झाल्यानंतर मुलांसाठी शाळा सुरू केली. आज त्या शाळेतील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे पाहून समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले.

अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार दिल्यने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, वडील बाबा आमटे यांनी आनंदवनातून समाजसेवेची प्रेरणा दिली. त्या प्रेरणेनेच आम्ही हेमलकसा येथे आदिवासी बांधवांसाठी कार्य सुरू केले. सेवाभावाने सातत्याने काम केल्यास समाजाचा विश्वास संपादन करता येतो. कोणतेही काम लहान समजू नये; मनापासून आणि समर्पित भावनेने केलेल्या कार्यातूनच समाजात परिवर्तन घडते, असे ते म्हणाले.डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे तीनशे वर्षांपूर्वी समाजपरिवर्तनाचा आदर्श घालून दिला. त्याच धर्तीवर डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, लोकाभिमुख समाजसेवा आणि न्यायप्रिय राज्यकारभाराचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार डॉ. मंदाकिनी आमटे यांना प्रदान केल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे. यंदापासून हा पुरस्कार देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून तरुणांनी आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.नामविस्तार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, लोकवादन, ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शन, निबंध स्पर्धा, लोककला सादरीकरण तसेच वृक्षारोपण आदी कार्यक्रम पार पडले.

या कार्यक्रमास उद्योजिका सुवासिनी शहा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजादेवी मोहिते पाटील, एम. डी. कमळे, प्रा. सचिन गायकवाड, ऍड. मल्लिनाथ शहाबादे, यतिराज होनमाने, प्रा. जैनुद्दीन मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.

Previous Post

सांगोल्यात ७ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

Next Post

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या नेतृत्वाखाली घुमणार ‘जय श्रीराम’चा नारा

Related Posts

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
Next Post
डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या नेतृत्वाखाली घुमणार ‘जय श्रीराम’चा नारा

डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या नेतृत्वाखाली घुमणार 'जय श्रीराम'चा नारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025