मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी एकमताने निवड!
सोलापूर: जय श्रीराम च्या जयघोषात आणि अत्यंत उत्साही वातावरणात श्रीराम जन्मोत्सव सोलापूर मध्यवर्ती महामंडळाच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या उत्सव अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश रा. कोठे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

शिवस्मारक येथे मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.यंदाचा श्रीराम नवमी उत्सव अधिक भव्य, दिव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी सामाजिक बांधिलकी जपत ५१ श्रीराम मूर्ती विविध मंडळांना देण्याची घोषणा केली. कार्यक्रमात जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंह राजपूत यांनी अयोध्या येथील प्रभू रामचंद्र मंदिराचा प्रेरणादायी इतिहास मांडला, तर रवी कोटमळे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवर भाष्य केले.

या बैठकीस नगरसेवक बिज्जू प्रधाने, रवि काका बंडे, अॅड. दत्ता पवार, मदनजी मोरे, दास काका शेळके (मराठा महासंघ), नगरसेवक शिवराज गायकवाड, सागर मोरे, राजाभाऊ निकम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.मध्यवर्ती महामंडळ कार्यकारिणीचे सहकार्यहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, उपाध्यक्ष संजय साळुंके, सचिव समर्थ बंडे, खजिनदार संदीप जाधव, सल्लागार अमित राऊत तसेच सदस्य प्रसाद झेडंगे, प्रशांत पवार, संस्कार नरोटे, अर्जुन मोहिते, सुरज भोसले आणि लतेश हिरवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची प्रस्तावना यतीराज होनमाने यांनी केली.”डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचा श्रीराम जन्मोत्सव एक नवा आदर्श निर्माण करेल,” असा विश्वास यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
डॉ. कोठे यांच्या निवडीसोबतच उत्सवासाठी खालील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली:
उत्सव अध्यक्ष: डॉ. सूर्यप्रकाश कोठे
उपाध्यक्ष: हरी जाधव, रोहन मराठे, समर्थ नावडे
कार्याध्यक्ष: जितेश मासे
सहकार्याध्यक्ष: जयसिंग कैयावाले
सचिव: निशांत साबळे
सहसचिव: दिनेश चाबुकस्वार, सिद्धू मडगे, विनोद गायकवाड
खजिनदार: प्रवीण गलांडे
सेक्रेटरी: शुभम कराळे
प्रसिद्धीप्रमुख: रोहित माशाळकर, आदित्य फडतरे










