सोलापूर: डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर (सिव्हिल हॉस्पिटल) येथील रुग्णसेवेचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. डी. जयकर यांच्या माहितीनुसार, रुग्णालयासाठी नवीन १.५ टेस्ला (1.5 Tesla) एमआरआय (MRI) मशीन खरेदी करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया (e-Tender) सुरू करण्यात आली आहे.
या नवीन मशीनमुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रुग्णांना आता अधिक अचूक आणि जलद निदान मिळण्यास मदत होणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार, नोंदणीकृत पुरवठादारांकडून ही निविदा ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आली आहे. ही प्रक्रिया १८ मार्च ते ८ एप्रिल २०२६ (सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत).व निविदा सादर करण्याची अंतिम मुदत: ८ एप्रिल २०२६. व ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता, निविदा उघडण्याची प्रक्रिया अधिष्ठाता कार्यालयात पार पडणार आहे


.इच्छुक पुरवठादारांनी ई-निविदा पोर्टलवर ‘बीड लॉक’ केल्यानंतर कागदपत्रांच्या दोन मूळ प्रती (Hard Copies) अधिष्ठाता कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. अटी पूर्ण न करणाऱ्या निविदा स्वीकारल्या जाणार नाहीत, अशी माहिती अधिष्ठाता ऋत्विक जयकर यांनी दिली आहे.. ही निविदा http://mahatenders.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे अशी ही माहिती त्यांनी दिली आहे










