सोलापूर: कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव व जिल्हाध्यक्ष अरुणभाऊ क्षीरसागर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


या सत्कार समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, पाहुण्यांना पुष्पगुच्छांऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ हे वैचारिक पुस्तक आणि नॅपकिन बुके देऊन सन्मानित करण्यात आले. सत्कारानंतर संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आणि या प्रश्नी सकारात्मक सहकार्य करण्याची विनंती अध्यक्ष-उपाध्यक्षांना करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरू, सरचिटणीस धन्याकुमार राठोड, कोषाध्यक्ष कल्याण श्रावस्ती, योगेश कटकधोंड, रामदास गुरव, सावळा काळे, नरसिंह गायकवाड, देविदास म्हेत्रे, संतोष जाधव, मकरंद बनसोडे, रमेश गायकवाड, दीपक चव्हाण, नागेश धोत्रे, संजय कुंभार, राजू राठोड यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.










