सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्यासमोर साई रिसॉर्ट, ॲडव्हेचर पार्क व ग्रामीण पर्यटन केंद्राचे उद्घाटन गुरुवार दि. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती नागेश कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूर जिल्ह्यात पर्यटनाला भाव मिळावा तसेच ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडावे.नागरिकांना कुटुंबीयांसमवेत विरंगुळा मिळावा या उद्देशातून हे रिसॉर्ट सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी, वॉटर ॲक्टिव्हिटीसह इतर ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. शैक्षणिक, व्यावसायिक कार्यक्रमासाठी हॉलची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुनील शेळके, आ. डॉ. धर्मराव आत्राम, माजी आमदार राजन पाटील, पाणीवेस तालीमचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकरआदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने, आ. विजयकुमार देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह आमदार आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पत्रकार परिषदेस आतिशराव बचुटे , गणेश बचुटे, कालिदास शिंदे आदी उपस्थित होते.










