सोलापूर : श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज कंगनाळकर तर कार्याध्यक्षपदी विजय कुलथे यांची निवड करण्यात आली.शनिवारी, वीरशैव भवन येथे झालेल्या श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. प्रारंभी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी महामंडळाचे सचिव बसवराज सावळगी, उपाध्यक्ष केदार वनारोटे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी रेवणसिध्द आवजे, गणेश चिंचोळी, सुदीप चाकोते, सिध्देश थोबडे, माजी अध्यक्ष राजाभाऊ आलुरे, सचिन शिवशक्ती, प्रिया बसवंती, विजयकुमार बमगुंडे, प्राचार्य विद्यानंद स्वामी, नितीन कुलकर्णी, गौरव जक्कापुरे, मनोज कलशेट्टी, गिरीश मंद्रपकर, राम वाकसे यांची प्रमुख उपस्थिती होती.











