Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 29, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
0
SHARES
67
VIEWS

सोलापूर: महसूल विभागात भ्रष्टाचाराचे लोण किती खोलवर पसरले आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. मोहोळ तालुक्यातील वाफळे येथील तलाठ्याने जप्त केलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी मागितलेली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. सुदर्शन रमेश जाधव (वय ३० वर्षे) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

​​

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांचे इतर दोन ट्रॅक्टर चालक मित्र वाफळे गावच्या हद्दीतून ट्रॅक्टरने मुरूम वाहतूक करत होते. २७ मार्च २०२६ रोजी तलाठी सुदर्शन जाधव यांनी हे ट्रॅक्टर पकडले होते. या ट्रॅक्टरवर दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि ते सोडून देण्यासाठी जाधव याने तिन्ही ट्रॅक्टर मालकांकडे प्रत्येकी ३३,००० रुपये प्रमाणे एकूण ९९,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.​तक्रारदार यांच्या दोन मित्रांनी प्रत्येकी ३३,००० रुपये याप्रमाणे ६६,००० रुपये तलाठ्याला दिले होते. मात्र, तक्रारदार राजकिरण सावंत यांच्याकडे केवळ २३,००० रुपये उपलब्ध असल्याने त्यांनी तेवढी रक्कम दिली होती. उर्वरित १०,००० रुपये देणे अद्याप बाकी होते. ही उर्वरित रक्कम दिल्याशिवाय काम पूर्ण होणार नाही, अशी भूमिका तलाठ्याने घेतली होती.​​वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून तक्रारदार यांनी सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली आणि रीतसर तक्रार नोंदवली.

या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने २८ मार्च २०२६ रोजी पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तलाठी सुदर्शन जाधव याने स्वतःसाठी आणि आपल्या वरिष्ठांसाठी १०,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.​त्यानुसार, सोलापूर ग्रामीणमधील मोहोळ परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून १०,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना सुदर्शन जाधव याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ आणि ७(अ) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते व त्यांच्या पथकाने केली.

Previous Post

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

Next Post

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

Related Posts

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान
सोलापूर जिल्हा

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर जिल्हा

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन
सोलापूर जिल्हा

महागाईविरोधात ‘आप’चे बैलगाडी आंदोलन

May 20, 2026
सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!
क्राईम

सोलापूर शहरात रात्रीच्या घरफोड्यांचा पर्दाफाश!

May 20, 2026
बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!
सोलापूर जिल्हा

बालाजी अमाईन्सची ऐतिहासिक झेप!

May 20, 2026
Next Post
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

जिल्ह्यातील साडेचार हजार मेडिकल दुकाने बंद

May 20, 2026
मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

मध्यवर्ती एसटी स्थानकातील तब्बल २२ सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू; प्रवाशांत समाधान

May 20, 2026
जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांची तक्रार खपवून घेतली जाणार नाही ; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

May 20, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025