Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 31, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर,; देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा असलेल्या आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजलेल्या लगान या चित्रपटाचे पटकथाकार तसेच असोसिएट डायरेक्टर कुमार दवे यांचे व्याख्यान शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6. 25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अ‍ॅम्फी थिएटर ) येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय चित्रकार डॉ. सचिन खरात हे प्रमुख पाहुणे असणार आहेत.

ब्रिटीश राजवटीमध्ये देशाच्या एका गावात भारतीय तरूणांनी क्रिकेटच्या माध्यमातून इंग्रजांना हरवून भारताचा स्वाभिमान कशा प्रकारे टिकवला आणि ब्रिटीश राजवटीला कशा प्रकारे हादरा दिला याचे चित्रण असलेला प्रसिध्द अभिनेता अमीर खान यांचा लगान हा चित्रपट संपूर्ण देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्या चित्रपटाची पटकथा कशा प्रकारे लिहण्यात आली त्यावेळी घडलेले अनेक किस्से या चित्रपटाचे पटकथाकार असलेले कुमार दवे हे आपल्या व्याख्यानातून सांगणार आहेत. आजच्या तरूण पिढीला कुमार दवे यांचे व्याख्यान प्रेरणादायी ठरणार आहे. असेही यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात त्यातूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6.25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह चार हुतात्मा पुतळा चौक सोलापूर (अ‍ॅम्फी थिएटर )येथे आयोजित करण्यात आलेल्या कुमार दवे यांच्या व्याख्यानाचा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरीकांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष अमोल धाबळे,कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, अविनाश महागांवकर, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर आदी कार्यरत आहेत.

Previous Post

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

Next Post

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..

शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025