Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आमदार जयंत आसगावकर यांच्या दणक्याने शिक्षण विभागाची धावपळ; प्रलंबित देयके आणि ‘शालार्थ आयडी’चे प्रश्न जागेवरच सुटले!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आमदार जयंत आसगावकर यांच्या दणक्याने शिक्षण विभागाची धावपळ; प्रलंबित देयके आणि ‘शालार्थ आयडी’चे प्रश्न जागेवरच सुटले!
0
SHARES
32
VIEWS

सोलापूर पुणे: राज्यातील शिक्षकांची थकीत बिले आणि प्रलंबित प्रशासकीय कामांबाबत शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात दिवसभर थांबून त्यांनी थकीत बिलांचा सविस्तर आढावा घेतला. “संचालक स्तरावरील सर्व बिले आजच्या आज मार्गी लावा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी शिक्षण संचालक महेश पालकर यांना दिले. या धडक कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

यावेळी बोलताना आमदार आसगावकर म्हणाले की, “अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी ३१ मार्चपूर्वी सर्व थकीत बिले दिली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशासकीय स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक अधिकारी ऐनवेळी बिलांमध्ये किरकोळ त्रुटी काढून ती प्रलंबित ठेवतात, ही बाब अत्यंत गंभीर आहे.” जे अधिकारी हेतुपुरस्सर बिले काढण्यास विलंब लावतात, त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली.

केवळ बिलांचाच नव्हे, तर शिक्षकांच्या इतर जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरही त्यांनी चर्चा केली. शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांना प्रलंबित असलेले ‘शालार्थ आयडी’ त्वरित देण्याच्या सूचना केल्या. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांना भेडसावणाऱ्या पीएफ (भविष्य निर्वाह निधी) बिलांच्या समस्येवर त्यांनी थेट जागेवरूनच तोडगा काढला. आमदार आसगावकरांच्या सूचनेनंतर, संचालक पालकर यांनी कोल्हापूर वेतन पथक अधीक्षकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून तातडीने पीएफ बिले देण्याचे निर्देश दिले.

  • शिक्षकांचे प्रश्न ‘ऑन द स्पॉट’ निकाली या बैठकीवेळी पुणे आणि कोल्हापूर विभागातून मोठ्या संख्येने शिक्षक बांधव उपस्थित होते. शिक्षकांनी आपले वैयक्तिक आणि सामूहिक प्रश्न आमदार जयंत आसगावकर यांच्यासमोर मांडले. यावेळी त्यांनी संचालक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधून अनेक तांत्रिक प्रश्न जागेवरच निकाली लावले.
  • आमदार जयंत आसगावकर यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या फायलींना गती मिळाली असून, ३१ मार्चच्या अखेरीस शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे शिक्षक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ‘वतन’ जमिनीवर डोळे? मोडनिंबमध्ये शेतकऱ्याची फसवणूक; आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात न्यायनिवाडा!”

Next Post

“सोलापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची मोठी भेट; १५ व्या वित्त आयोगातून ८५ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर!”

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
“सोलापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची मोठी भेट; १५ व्या वित्त आयोगातून ८५ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर!”

"सोलापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची मोठी भेट; १५ व्या वित्त आयोगातून ८५ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025