Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भीमा नदी कोरडी, सोलापूरची तहान; उजनीतून पाणी सोडण्याचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत

Solapur Mirror by Solapur Mirror
April 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भीमा नदी कोरडी, सोलापूरची तहान; उजनीतून पाणी सोडण्याचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर : यंदा भीमा नदीतून एकदाच पाणी सोडण्यात आले आहे. आता भीमा नदी पात्र कोरडेठाक असून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा देखील कोरडा पडला आहे. भीमेतून पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. अधीक्षक अभियंत्यांनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव १६ एप्रिल रोजी जलसंपदा विभागाला पाठविला आहे.आगामी हंगामात पावसाचे प्रमाण असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत यंदा एकदाच पाणी सोडले आहे. आता उन्हाचा तडाखा वाढल्याने भीमा नदीकाठ तहानला आहे. शेतकऱ्यांनी नदीत पाणी सोडण्याची मागणी वारंवार केली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही पाणी सोडले जाईल, असे आश्वस्त केले आहे.

त्यानुसार सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुवीरेंद्र सखाराम खांडेकर यांनी १६ एप्रिल रोजी जलसंपदा विभागाला प्रस्ताव पाठविला आहे. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास मान्यता द्यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मात्र, जलसंपदा विभागाने अजून त्याला मंजुरी न दिल्याने भीमा नदीत पाणी कधी सोडले जाणार, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नाही.

पाच-साडेपाच टीएमसी पाण्याचे आवर्तन
सध्या धरणात एकूण ७७ टीएमसी पाणी असून त्यात साडेतेरा टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. आता नदीतून पाणी सोडण्यासाठी पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. नदीवर अवलंबून अनेक गावांचा पाणीपुरवठा नदीत पाणी नसल्याने विस्कळीत झाला आहे.

गतवर्षी धरण उणे ४.७३ टक्के
मागच्या वर्षी २१ एप्रिल रोजी उजनी धरणात ६१.१२ टीएमसी पाणी होते. धरणात उपयुक्त पाणीसाठा उणे ४.७३ टक्के होता. यंदा मंगळवारी (ता. २१) उजनीत ७७.१५ टीएमसी पाणी असून उपयुक्त पाणीसाठा २५.१८ टक्के (१३.४९ टीएमसी) आहे. सध्या शेतीसाठी कालव्यातून, बोगद्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.

Previous Post

नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पोचे आयोजन..!

Next Post

भांडण सोडविताना मारहाणीत जखमी झालेल्या १८ वर्षीय युवकाचा अखेर मृत्यू

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
भांडण सोडविताना मारहाणीत जखमी झालेल्या १८ वर्षीय युवकाचा अखेर मृत्यू

भांडण सोडविताना मारहाणीत जखमी झालेल्या १८ वर्षीय युवकाचा अखेर मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025