Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कांदलगावात नृसिंह जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ

Solapur Mirror by Solapur Mirror
April 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कांदलगावात नृसिंह जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ
0
SHARES
1
VIEWS

30 एप्रिल ला प्रकट दिनाचा मुख्य सोहळा

बार्शी : तालुक्यातील कांदलगाव येथील तीर्थक्षेत्र श्री नृसिंह मंदिरात नृसिंह जयंती (प्रकट दिन) निमित्त पारंपरिक अखंड हरिनाम सप्ताह, गीतरामायण व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला आज सकाळी भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज पहाटे काकड आरती, भजन, हरिपाठ व नामस्मरण, तसेच संध्याकाळी प्रवचन आणि रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सप्ताहात शुक्रवार दि.24 ह.भ.प. गुरुवर्य गोपाल अण्णा वासकर महाराज (पंढरपूर), शनिवार 25 रोजी ह.भ.प. राजेंद्रजी महाराज सावंत (किहीपाई, ता. जि. बीड), रविवार दि.26 रोजी ह.भ.प. भागवताचार्य ज्ञानेश्वरी ताई सोळंखे (परतूर), सोमवार 27 रोजी ह.भ.प. गुरुवर्य अण्णासाहेब बोधले महाराज (डिकसळ),मंगळवार दि.28 रोजी ह.भ.प. शिवलीलाताई पाटील महाराज (बार्शी),बुधवार 29 रोजी ह.भ.प. माऊली महाराज पठाडे (कर्जत) व गुरुवार 30 रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर (माऊली) नगरे महाराज यांच्या कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे. दररोज दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत रामयनाचार्य संतोष मुंडे महाराज यांचे गीत रामायण होणार आहे.नामसंकीर्तनाच्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय झाला असून, भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. गीतरामायण व ज्ञानेश्वरी पारायणातून रामकथा व संत साहित्याचे चिंतन घडत आहे.

सप्ताहादरम्यान हरिजागर, भजन व विविध धार्मिक कार्यक्रमांनी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नृसिंह जयंतीच्या दिवशी दुपारी उत्सव मूर्तीची मिरवणूक, आणि सूर्यास्त वेळी प्रकट दिन सोहळा(गुलालाचा कार्यक्रम) पार पडणार आहे.शुक्रवार 1 मे रोजी सीताराम गड खर्डा चे महंत महालिंग महाराज यांचे कल्याचे कीर्तन नंतर महाप्रसाद होईल. सायंकाळी शेरणी वाटप, रात्री पालखी सोहळा होईल. तर शनिवारी देवाला निरोप दिल्यानंतर सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती देवस्थान चे अध्यक्ष हरिदास फुरडे-पाटील आणि सरपंच प्रदीप नवले यांनी दिली.

नृसिंह प्रकट दिनानिमित्त गावातील जवळपास 50 टक्के महिलांना नऊ दिवसाचा उपवास असतो. तर प्रकट दिनी अख्ख्या गावाला उपवास असतो

Previous Post

जव्हेरी अॅडव्हर्टायझिंगचे प्रमुख संचालक संदीप जव्हेरींचे निधन

Next Post

व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले – आमदार चित्रा वाघ

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले – आमदार चित्रा वाघ

व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळाले - आमदार चित्रा वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025