पोलिसांना मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकज्ञानदेव १४ वर्षे झोळ कुटुंबीयांकडे काम केल्याची माहिती; पोलिसांच्या कामाचे कौतुक
बारामती : समाजसेवक आणि उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात तपासाला वेग आला असून, संशयित आरोपी ज्ञानदेव शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणातील चर्चेत असलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्ञानदेव शिंदे याचे झोळ कुटुंबीयांशी असलेले कथित जुने संबंध.
शिंदे हा सुमारे १४ वर्षे झोळ कुटुंबीयांकडे कामाला होता, तसेच राणा सूर्यवंशी यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्याला वर्षभरापूर्वी सूर्यवंशी यांच्याकडे कामावर ठेवण्यात आले होते असेही पोलिसांकडून समजते.दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास झोळ, त्यांच्या पत्नी माया झोळ आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत.संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले होते. त्यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी तपासाला गती देत तातडीने कारवाई केल्याचे समोर येत आहे.