सोलापूर :सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. वाघमारे, डॉ. तिरणकर, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख, एल. एस. मेळकुदे तसेच महाविद्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या समाजसेवेतील योगदानाची आठवण करून आदरांजली अर्पण केली.











